लासगाव ता.पाचोरा ( बाबुलाल पटेल)
जळगाव दिनांक ३ मेहरुन येथील बागबान विकास फाउंडेशन सामाजिक संस्थे मार्फत गरजू रुग्णांना ऑपरेशनला मदत करण्यात येते. मान्यवराच्या हस्ते दिले जाते. यावेळी जळगावचे माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेटकर जिल्हा परिषद माध्यमिक जळगाव व आरोग्यम हॉस्पिटलचे संचालक डॉ. छाबडा यांच्या हस्ते एक ड्रेस नारळ पाणी तसेच ७ हजार रुपयेचा चेक आर्थिक मदत म्हणून मोहम्मद सलीम युसुफ बागवानला देण्यात आले. [ads id="ads1"]
जळगाव जोशी पेठ बागवान मोहल्ला रहिवासी मोहम्मद सलीम युसुफ बागवानवय वर ५५ हात गाडीवर केळी विकण्याचा व्यवसाय करतात गेल्या तीन-चार वर्षांपासून बीपी पेशंट असून त्यांना हर्निया, आजाराने त्रस्त होते. त्याचा परिणाम असा होताकि त्याचा नेहमी त्रास होता त्या आजारासाठी ऑपरेशनला ५० हजार रुपये लागणार होते त्यामुळे ते ऑपरेशन करण्यास टाळायचे आजाराला सहन करत होते अशावेळी बागबान विकास फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ शरीफ बागवान यांनी आरोग्य हॉस्पिटल चे संचालक डॉ.जगमोहन छाबडा यांना विनंती करून गरीब रुग्णाचे ऑपरेशन कमी दरात करून द्यावे अशी मागणी केली व २३ हजारात हे ऑपरेशन करण्यात आले व त्यात ७००० रुपये फौंडेशनच्या वतीने आर्थिक मदत म्हणून देण्यात आली. अशा प्रकारचे रुग्णांना गेल्या पंधरा वर्षापासून छोट्याशा प्रमाणात मदत देऊन सहकार्य केले जाते.[ads id="ads2"]
वेळोवेळी रुग्णांना मदत आर्थिक मदत करण्यात येते आतापर्यंत साडेतीनशेच्या वर ऑपरेशन या माध्यमातून करण्यात आलेली आहे.असाच रुग्ण सलीम युसुफ बागवान डबल हर्निया व बीपी या आजारापासून ग्रस्त होते ५ वर्षापासून आजाराला त्रासलेल्या मोहम्मद सलीम बागवान ला या आजारापासून मुक्त करून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे व उत्तमरीत्या तो बरा आहे या चांगल्या कार्यासाठी आरोग्यम हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगमोहन छाबडा यांच्या सहकार्य मिळाले व बागबान विकास फाउंडेशने पुढाकार घेऊन हे ऑपरेशन करण्यास मदत केली यावेळी आरोग्यम हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगमोहन छाबडा माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर (जिल्हा परिषद जळगाव) नासिर युसुफ बागवान, जितेंद्र बारी,मोलवी असरार बागवान, एजाज शाह ,मोलवी वसीम बागवान,दानिश बागवान ,इरफान बागवान यांची उपस्थिती होती यावेळी घरच्या नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानले.