यावल (सुरेश पाटील)
येथील श्रीव्यास व श्रीराम मंदिरात गेल्या शनिवार पासून दि.16/12/23 पासून संगीतमय श्री विष्णुपुराण कथा प.पू.माॅ ममता दीदी यांच्या सुमधूर वाणीत सांगण्यात येत आहे.त्या निमित्तानेच आज दि.23/12/23,शनिवार रोजी श्री.व्यास महाराजांची दिंडी संपूर्ण यावल शहरातून काढण्यात आली.मिरवणूकीची सुरूवात मंदिरापासून करण्यात आली.रस्त्याने भाविकांनी रंगीबेरंगी रांगोळया काढल्या होत्या.प्रथम कलशाची प्रतिमेचा रथ होता.नंतर कलश घेऊन महिलांनी सहभाग घेऊन साथ दिली.सदर कार्यक्रमात महिलांनी भक्तीगीत गायलीत.[ads id="ads1"]
महिला भजनी मंडळात यावल तसेच राजोरा येथील महिलांनी एका सुरात भजने म्हणत सर्वांचेच लक्ष वेधून विविध प्रकारची भजने सादर केलीत.तसेच पुरूष भजनी मंडळाने सुध्दा निरनिराळे भक्तीगीत सादर केली.श्री विजय महाराज, टाकरखेडा यांच्यासोबत टाळकरयांनी भक्तीगीत म्हणत साथ दिली.बोरावल, टाकरखेडा,विरावल येथील टाळकरी यांनी भाग घेतला.[ads id="ads2"]
सदर कार्यक्रमावेळी सजविलेल्या पालखीमधे श्री.व्यासांचया पादुका व फोटो ठेवण्यात आला होता.भाविकांनी श्री.व्यासांचे दर्शन घेण्यासाठी दुतर्फा गर्दी केली होती.भाविकांना खडीसाखर प्रसाद म्हणुन वाटण्यात आली.मिरवणुक व्यास मंदिरापासून देवी मंदिर, मेनरोडाने चावडीवरून बारी वाडा,महाजन गल्ली,वाचनालय मार्गे देशमुखवाडा,महादेव मंदिरापर्यंत काढल्यात आली.सदर मिरवणुकीमध्ये श्री.व्यास मंदिर संचालक मंडळ तसेच शहरातील ईतर भाविक उपस्थित होते.त्यानंतर महादेव मंदिर या ठिकाणी सोहळ्याचा सर्वांचेच आभार मानून ठीक ८ .समारोप करण्यात आला.आज रविवार दि.24/12/23, रविवार काल्याचे कीर्तन सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत होइल.नंतर काल्याचा प्रसाद उपस्थित भाविकांना वाटप करण्यात आला .



