फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीतील गुटखा किंग जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



५ लाख २४ हजार ७२९ रुपये मुद्देमालासह संशयित आरोपी ताब्यात

पोलीस स्टेशन हद्दीत कलेक्शन करणारा कोण..?

यावल  (सुरेश पाटील) तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत न्हावी गावात अवैध सुगंधीत पान मसाला व तंबाखू गुटखा सर्रासपणे खुलेआम विक्री होत असल्याची खबर जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका कमलाकर बागुल,पोना.रंजीत जाधव, यांनी न्हावी गावात चौकशी, तपास,खात्री करून सुरेश किराणा दुकानात व मोहिणि कुंज इमारतीच्या पहिल्या माळ्यावर अचानक धाड टाकून अनुक्रमे १ लाख ५८ हजार ७२४ व ३ लाख ६६ हजार असा एकूण ५ लाख ६६ हजार ७२९ रुपयाच्या मुद्देमालासह संशयितआरोपीस ताब्यात घेतल्याची घटना काल शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी घडल्याने भादवि कलम ३२८,२७२,२७३,१८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली.[ads id="ads1"]

       सविस्तर माहिती अशी की यावल तालुक्यातील न्हावी गावात सुरेश किराणा येथे एक इसम बेकायदा शासनाने प्रतिबंधीत गुटखा पान मसाला विक्री करीत आहे  अशी खबर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस पथक व पंच असे मिळुन शासकीय वाहनाने न्हावी फाटा येथुन न्हावी गावातील सुरेश किराणा येथे येवुन शासकीय वाहन थांबवुन बातमीची खात्री करण्यासाठी पायदळ चालत जावुन सुरेश किराणामध्ये एक इसम शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पानमसाला विक्री करताना दिसुन आल्याची आम्हा पोलीस पथक व पंचांची खात्री झाल्याने लागलीच सदर सुरेश किराणा दुकाणावर 18.00 वाजता छापा टाकला.[ads id="ads2"]

        सदर इसमास पोलीसांनी त्यांची ओळख करून देवुन आम्हा पंचासमक्ष तेथे येण्याचा उददेश समजावुन सांगितला. तसेच सदर इसमास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सुनिल अशोक माखीजा वय 41 वर्षे व्यवसाय

किराणा दुकाण रा.न्हावी ता. यावल जि. जळगाव असे सांगितले.त्यांनतर आम्हा पंचासमक्ष सुरेश किराणा दुकाणाची पंचासमक्ष झडती घेतली असता खालीलप्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा,सुगंधीत पानमसाला व तंबाखु

मिळुन आला तो खालीलप्रमाणे

       विमल पान मसाला, विमल पान मसाला लहान, व्हीं १ तंबाखू लाल पाकीट, पानपराग प्रीमियम पान मसाला,पानपराग स्वादिष्ट पान मसाला,पान पराग एक्सट्रा प्लस,पान पराग एक्सट्रा प्लस पाऊस,एक्सपी २ तंबाखू, एक्सपी १० तंबाखू, zli जाफरानी जर्दा,रजनीगंधा पान मसाला,आरमडी प्रेमियम पान मसाला,एसआर १ तंबाखू, सागर पान मसाला २०००, सागर पान मसाला निळे पाकीट, सागर पान मसाला हिरवे पाकीट,विमल काळे पाकीट, असा एकूण एक लाख 58 हजार 724 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला.

      एकुण 158724/-रुपये कि.चा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला व तंबाखु मुद्देमाल ताब्यात घेवुन सदर इसम नामे सुनिल अशोक माखीजा वय 41 वर्षे यास आणीखी मुददेमाल कोठे ठेवला आहे का..?

पंचासमक्ष विचारणा केली असता त्यांने नमुद केले की उर्वरीत मुददेमाल त्याचे दुकाणाचे शेजारी असलेले मोहीणीकुंज इमारतीच्या दुकाणाच्या पहील्या माळयावर ठेवल्याचे सांगितले त्यांनंतर आम्ही पंचासमक्ष सदर मोहीणीकुंज इमारतीच्या

दुकाणाच्या पहील्या माळयावर पंचासमक्ष येथे जावुन पाहीले असता तळमजल्यावर एक इसम मिळुन आले.सदर

इसमास पोलीसांनी त्यांची ओळख करुन देवुन आम्हा पंचासमक्ष तेथे येण्याचा उददेश समजावुन सांगितला.तसेच सदर इसमास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अशोक मगनलाल माखीजा वय 65 वर्षे व्यवसाय किराणा दुकाण रा.न्हावी ता. यावल असे सांगितले.त्यांनतर आम्हा पंचासमक्ष सुरेश किराणा दुकाणाची पंचासमक्ष

झडती घेतली असता त्या ठिकाणी सुद्धा खालीलप्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला व तंबाखु असा एकूण ३ लाख ६६ हजार ५ रुपयेचा सुगंधित पान मसाला गुटखा मुद्देमाल मिळुन आला असा एकूण दोघे ठिकाणी ५ लाख २४ हजार ७२९ रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.

     अशा प्रकारे न्हावी तालुका यावल येथून शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी १८ वाजेच्या सुमारास सुरेश किराणा दुकान व मोहिनी कुंज इमारतीच्या किराणा दुकानाच्या पहिल्या माळ्यावरील सुनील अशोक माखिया व अशोक मगनलाल माखिया व्यवसाय किराणा दुकान राहणार नाही यांनी त्यांच्या ताब्यात वर नमूद वर्णनाचा एकूण पाच लाख 24 हजार 729 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू व गुटखा गुटख्याची अवैधरित्या विक्री करीता ताब्यात ठेवलेला माल मिळून आल्याने मुद्देमाला सह त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले सदर गुन्ह्याबाबत भादवी कलम ३२८,२७२,२७३,१८८ प्रमाणिक कारवाई करण्यात आली.

      फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध, दारू, सट्टा, पत्ता, क्लब अवैध प्रवासी वाहतूक सुरू असताना स्थानिक पोलिसांना दिसून येत नसल्याने फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत  कलेक्टर / कलेक्शन करणाऱ्या बाबत सुद्धा तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.अवैध धंदे करणाऱ्यांकडून कलेक्शन करणाऱ्यांचा शोध,तपास करून कारवाई करावी अशी सुद्धा मागणी सर्व स्तरातून होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!