यावल ( सुरेश पाटील ) शुक्रवार दि. 22 रोजी यावल नगरपरिषदेने यावल पोलीस बंदोबस्तात शहरातील सार्वजनिक वाचनालया जवळचे आणि न्यायप्रविष्ट प्रकरण असताना /अतिक्रमण काढून भेदभाव / पक्षपातीपणा केला त्याबद्दल यावल शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. [ads id="ads1"]
यावल शहरात नगरपालिका हद्दीत फालकनगर भागातील अनधिकृत बांधकाम पाडणे बाबत फालकनगर मधील, तसेच सुदर्शन चित्रमंदिर रोडवरील एका अतिक्रमण बाबत फालकनगर मधील अनिल मधुकर मोरे यांनी रीतसर लेखी तक्रार केली असताना त्या ठिकाणचे अतिक्रमण न काढता फक्त एका ठिकाणचे पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढून पक्षपातीपणा केला असल्याचे समोर आले आहे.[ads id="ads2"]
दि.23 जानेवारी 2023, 30 मे 2023, लोकशाही दिनात 9 ऑक्टोंबर 2023 रोजी अनिल मधुकर मोरे यांनी यावल नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर 703/11 या जागेवरील अनधिकृत बांधकामाबाबत लेखी तक्रार केली होती आणि आहे या तक्रारीनुसार यावल नगरपालिकेने आज पर्यंत अतिक्रमण काढलेले नाही. शुक्रवार दि.22 डिसेंबर 2023 रोजी नगरपालिकेने पोलीस बंदोबस्त फक्त एक अतिक्रमण काढण्यासाठी घेतला होता का..? यावल शहरात ठीक ठिकाणी बेकायदा,अनधिकृत अतिक्रमण बांधकाम झालेले आहे हे यावल नगरपालिका बांधकाम विभागाला दिसून येत नाही का..? आणि अतिक्रमण संदर्भात आलेल्या तक्रारीनुसार यावल नगरपालिका कारवाई का करत नाही..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीनुसार यावल नगरपालिकेने तात्काळ अतिक्रमण काढावे अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.



