कार्यारंभ आदेश देऊन मुदत संपल्यावर सुद्धा काम न केल्याने ठेकेदाराला पत्र : सार्वजनिक बांधकाम उपविभागाने अतुल पाटील यांच्या तक्रारीची घेतली दखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  (सुरेश पाटील) तालुक्यातील चितोडा अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा रोड प्रजीमा 14 किलोमीटर सुधारणा करणे बाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल तर्फे जळगाव येथील कॉन्ट्रॅक्टर वाय.एम.महाजन यांना दि.4 /8 / 2021 रोजी कार्यारंभ आदेश दिला होता आणि आहे. आणि रस्त्याचे काम करण्याची मुदत दि. 3/ 8 /2022 पर्यंत होती तरी रस्त्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित ठेकेदाराने न केल्याने लेखी पत्र देण्यात आले पुढील कारवाई काय होते..? याकडे सर्वांचे आणि तक्रारदार रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"]

             सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल उपविभागीय अधिकारी यांनी दि.19/12/ 2023 रोजी जळगाव येथील कॉन्ट्रॅक्टर वाय एम महाजन यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की,चितोडा अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा रोड प्रजिना १४ किमी १५/९०० ते २२/०० ची सुधारणा करणे हे काम आपण घेतलेले असुन सदर कामाचे कार्यारंभ आदेश दि. ०४/०८/२०२१ असे आहे. कामाची मुदत कार्यारंभ आदेशाच्या दिनांका पासुन १२ महिने इतकी म्हणजेच दि. ०३/०८/२०२२ पर्यंतच होती.आज रोजी सदर काम पुर्ण होणे अपेक्षित होते.परंतु आजपर्यंत आपण काम पुर्ण केलेले नाही.याबाबत आपणास वरील संदर्भिय पत्रानुसार वारंवार सुचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु आपण त्यास काही एक प्रतिसाद दिलेला नाही.[ads id="ads2"]

  सदर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाचा असल्याने लोकप्रतीनिधी नेहमी ते काम पूर्ण करण्याची मागणी करीत आहेत.नुकतेच या उपविभागास अतुल पाटील, लोकसभा क्षेत्रप्रमुख (रावेर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी निवेदन देवुन अपुर्ण काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असे कळविले आहे. तरी आपण त्वरीत काम सुरु करुन निविदा अटी व शर्ती नुसार काम पुर्ण करावे अन्यथा आपल्यावर निविदा अटी व शर्ती नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यलायास सादर करण्यात येईल.तसेच कामास मुदतवाढ मिळणेबाबतचा प्रस्तावही आपण या कार्यालयास सादर करावा. 

         उपोषण थांबवावे अतुल पाटील यांना पत्र-  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्र देऊन रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने उपोषणाचा इशारा दिला होता त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी यांनी अतुल पाटील यांना दि. २०/१२/२०२३ रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण चितोडा अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा रोड प्रजिना १४ किमी १५/९०० ते २२/०० ची सुधारणा करणे हे काम अदयापर्यंत पुर्ण झाले नसल्याने दि.२७/१२/२०२३ रोजी या कार्यालयास उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिलेले आहे.सदर काम हे वाय.एम.महाजन. जळगाव या कंत्राटदाराने घेतलेले आहे. सदर सदर कामाचे कार्यारंभ आदेश दि. ०४/०८/२०२१असे आहे.कामाची मुदत कार्यारंभ आदेशाच्या दिनांका पासुन १२ महिने इतकी होती.

सदर कंत्राटदारास काम त्वरीत पुर्ण करावे अशा सुचना या कार्यालया मार्फत वेळोवळी देवुनही कंत्राटदाराने सदरचे प्रलंबित काम पुर्ण केलेले नाही. आता पुनश्च: संबंधीत ठेकेदारास पत्र देवुन प्रलंबीत असलेले काम त्वरीत पुर्ण करण्याचा सुचना देण्यात आलेल्या आहेत.त्याची एक प्रत आपल्या माहितीसाठी पाठविण्यात येत आहे.सदरचे काम त्वरीत सुरु करुन निविदा अटी व शर्ती नुसार संबंधीत कंत्राटदाराकडुन पुर्ण करुन घेण्यात येईल.तरी आपण दि. २७/१२/२०२३ रोजीचे उपोषण थांबवावे असे दिलेल्या निवेदनात यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्यांने म्हटले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!