जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय हरित सेना आणि न्यू वाघ डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने "द दारूचा नाही तर द दुधाचा" हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. आज 31 डिसेंबर या दिवसाला तरुणाई व्यसनाधीन होऊन दारू आणि तस्सम प्रकारचे व्यसन करीत असते. परंतु "द दारूचा नाही तर द दुधाचा" आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून वरील दोन ही संघटनांनी आणि डेअरीने आज जळगाव शहरांमध्ये हा दिवस साजरा केला. या उपक्रमामध्ये दिगंबर कट्यारे राज्य कार्यवाह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आनंद ढिवरे अंनिस कार्यकर्ता, शक्ती महाजन सामाजिक कार्यकर्ते, प्रवीण पाटील राष्ट्रीय हरित सेना मास्टर ट्रेनर आणि विकास वाघ संचालक न्यू वाघ डेअरी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना व्यसनापासून परावृत्त करून सामाजिक जाणीव निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.


