रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ५०० शुर महारांना अभिवादन व मानवंदना देण्यात आली. [ads id="ads1"]
सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन दिप व धुप प्रज्वलन करण्यात आले. समता सैनिक दला तर्फे मानवंदना देण्यात आली. नंतर भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल, संघरत्न दामोदरे व उपासक यांचे मार्फत त्रिसरण पंचशील व भिम स्मरण, भिमस्तुती घेण्यात आली. [ads id="ads2"]
सदर कार्यक्रमाला कामगार नेते दिलीप कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, लोकनियुक्त सरपंच, वाघोड संजय मशाने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कोंघे,धनराज घेटे, गौतम अटकाळे, विशाल तायडे, मनोहर ससाणे, पंडीत महाले, बाळू तायडे, अमर तायडे, समता सैनिक दलाचे संतोष तायडे, महेद्र तायडे, अर्जुन वाघ, रितेश निकम, राजू बाऱ्हे, निलेश बाऱ्हे, अक्षय निकम, अमोल हिवरे, अनिल घेटे यांच्यासह मोठया संख्येने उपासक उपस्थित होते.