यावल तहसीलदार यांनी केली २ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


२ ट्रॅक्टर जप्त : कारवाईत सातत्य असल्याने मुजोर वाळू माफियांमध्ये घबराट

यावल ( सुरेश पाटील ) यावल नगरपरिषद साठवण तलाव परिसराकडून बोरावल- टाकरखेडा रस्त्यावर खंडेराव मंदिरा जवळून अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती आज दि.२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८:३० ते ९:३० वाजेच्या सुमारास मिळाल्याने यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीकर यांनी स्वतः व महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूकदारांवर बेधडक कारवाई करून दोन्ही ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात जप्त करून पुढील कार्यवाही सुरू केली.यावल तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून अवैध वाळू,अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना भेदभाव, पक्ष-पातीपणा न करता तसेच कोणाच्याही प्रभावाला बळी न पडता सातत्याने कारवाई होत असल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]

         याबाबत सविस्तर माहिती अशी की वरील नमूद वेळेवर आणि ठिकाणी स्वराज ट्रॅक्टर क्र. MH 40 L - 1910 या ट्रॅक्टर व ट्रॉली वाहनातून एक ब्रास रेती हे गौण खनिज वाहतूक करताना आढळून आले,गौण खनिज परवाना वाहतूक पास नसल्याची माहिती तसेच ट्रॅक्टर मालक यावल येथील भरत कोळी असल्याचा लेखी जबाब देणार सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे राहणार यावल यांने दिला आहे.[ads id="ads2"]

       याचप्रमाणे याचवेळी दुसरे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक शुभम संजय पाटील यांने आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे की, स्वराज्य ट्रॅक्टर क्र. MH 19- AP 7342 चे मालक बाळू फेगडे आहेत.

      अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर जप्त करण्याच्या पंचनामावर अनुक्रमे पंच म्हणून राहुल राजेंद्र कचरे,मयूर उत्तम लोणारी यांची स्वाक्षरी असून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे सदर कारवाई करताना प्रामुख्याने यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत बामनोद मंडळ अधिकारी सौ.बबीता चौधरी,यावल तलाठी ईश्वर कोळी,साकळी येथील तलाठी मिलिंद कुरकुरे,तहसीलदार यांचे वाहन चालक अरविंद बोरसे इत्यादी महसूल कर्मचारी पथकाने बेधडक कारवाई केली.

        यावल तालुक्यात गेल्या सात-आठ महिन्याच्या कालावधीत अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कारवाई करून जास्तीत जास्त प्रमाणात महसूल वसूल झाला आहे आणि यापुढे सुद्धा जास्तीत जास्त महसूल कसा वसूल होईल याकडे संपूर्ण महसूल विभागाने लक्ष केंद्रित करून कोणाच्याही दडपणाला प्रभावाला बळी न पडता अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई होणार असल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!