रावेर तालुका प्रतिनीधी (विनोद हरी कोळी) : ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जे बी अंजने होते तर सुत्रसंचलन प्रा डॉ रेखा पाटील यांनी केले. [ads id="ads1"]
प्रमुख वक्ते प्रा डॉ महेन्द्र सोनवणे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची गाणी म्हणत अर्थ स्पष्ट केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या गाण्यात ग्रामीण जीवनाचा सार आहे असे सांगितले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.