रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयांमध्ये जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे उपस्थित होते. व्याख्यानमालेत रावेर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जी. आर. ढेंबरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. [ads id="ads1"]
त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एड्स आजर दक्षिण आफ्रिकेतून जगभर पसरला. संपूर्ण जगामध्ये या रोगाने भीतीचे वातावरण तयार केले. विविध स्वयंसेवी संघटना, रासेयोचे स्वयंसेवकांनी केलेल्या जाणीव जागृतीमुळे या आजाराविषयीचे अनेक भ्रम समाजातून दूर झाले. [ads id="ads2"]
उपस्थित स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना देतांना आर. आर. सी. क्लब अंतर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्वांनी एड्स जनजागृती साठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे दुसरे वक्ते ग्रामीण रुग्णालय पाल येथील आय. सी. टी. सी. सल्लागार श्री. विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांना एड्स या रोगाविषयीची सविस्तर माहिती दिली. हा रोग कसा होतो? रोगापासून बचाव कसा करावा या विषयी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी त्यांच्या अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना ‘माहिती हीच शक्ती’ असून एड्स या रोगाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास रा. से. यो. स्वयंसेवक तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.