ग्रामपंचायत निंबोल येथे 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस म्हणून साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ग्रामपंचायत निंबोल येथे 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस म्हणून साजरा

रावेर तालुका प्रतिनिधी  -विनोद हरी कोळी

आज दिनांक आज दिनांक 3 डिसेंबर 2023 या रोजी जागतिक अपंग दिवस म्हणून  निंबोल तालुका रावेर येथील ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रहार दिव्यांग संघटना  तालुका अध्यक्ष विनोद कोळी यांनी आपल्या शब्दसुमनांत व फुलगुच्छ देऊन उपस्थित दिव्यांग बांधवांचे स्वागत केले.[ads id="ads1"]

         त्यानंतर विनोद कोळी यांनी दिव्यांग बांधवांच्या योजना विषयी माहिती देण्यात आली. 2016 च्या शासन जी आर नुसार दिव्यांग बांधव यांना पाच टक्के निधी वितरित करण्यात येतो. याचे महत्त्व त्यांना पटवून दिले.  ५℅टक्के निधी शासन देत नसून  तो निधी घरपट्टी व इतर करवसुली मधून दिव्यांग बांधवांना दरवर्षी देण्यात येतो. तसेच संजय गांधी योजना अंत्योदय योजना तसेच दिव्यांग बांधव यांना स्वयंरोजगारासाठी दीड लाखापर्यंत वीज भांडवल कर्ज योजना अशा 44 योजनांपैकी विविध योजनांची माहिती दिव्यांग बांधवांना प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष विनोद कोळी यांनी दिली.[ads id="ads2"]

        तसेच ३ डिसेंबर या रोजी  मुंबई येथे दिव्यांग मंत्रालय विभागाचे उद्घाटन दिव्यांग मंत्रालय संस्थापक अध्यक्ष माननीय (बच्चुभाऊ उर्फ ओम प्रकाश )यांच्या हस्ते करण्यात आले होते. या दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे काम होणार आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधव आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक असून ,त्यांना सक्षम बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे काम शासन करणार आहेत याचे महत्व दिव्यांग बांधव यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर सर्व दिव्यांग बांधवांना फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

           त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर ग्रामपंचायत उपसरपंच अशोक पाटील ,ग्रामसेवक एम डी पाटील, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरुजी, किशोर तायडे ,रवींद्र पाटील, क्लार्क दिगंबर धनगर, भगवान चिकटे ,तसेच दिव्यांग बांधव गंभीर कोळी, अनिल कोळी ,गंभीर भिल्ल ,ज्ञानेश्वर पाटील ,रेखा तायडे ,जया तायडे ,गोकुळ कोळी  ,सुनील कोळी, तसेच इतर ग्रामस्थ ग्रामपंचायत  मध्ये मोठ्या संख्येने पस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!