यावल येथे वही मंडळ परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) 

खान्देश लोक कलावंत विकास प्रतिष्ठान तर्फे यावल येथे नुकताच वही मंडळ परिषद कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या खास उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.[ads id="ads1"]

     दि.२० डिसेंबर रोजी यावल येथे व्यासमंदीर हाँल मध्ये श्री खान्देश लोक कलावंत विकास प्रतिष्ठान तर्फे वही मंडळ परिषद आयोजन करण्यात आली होती या परिषदेसाठी खान्देश लोक कलावंत प्रतिष्ठानचे माननीय विनोद ढंगे हे उपस्थित होते.[ads id="ads2"]

      वही मंडळ कार्यक्रमात विनोद ढगे यांच्या प्रयत्नांमधून वही मंडळांना राज्य मान्यता मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी यावल परिसरातील वही मंडळांनाही आमंत्रित करण्यात आले होते.यात योगायोग वही मंडळ यावल,वात्मीक वही मंडळ पाडळसा, शिवबाबा वही मंडळ कठोरा,श्री दत्त वही मंडळ सौखेडा,जय मल्हार वही मंडळ डांभुर्णी,व्यासनगर वही मंडळ,सफश्रृंगी वही मंडप, इत्यादी वही मंडळ उपस्थित होते.

       कार्यक्रमाची सुरुवात रेणुका देवी मंदिरातून झाली यावेळी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले,ही संवाद यात्रा व्यास मंदिरापर्यंत काढण्यात आली होती या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते सुधाकर बाऊस्कर सर यांनी सर्व वहीमंडळ करत असलेल्या जनजागृतीसाठी त्यांचे अभिनंदन केले,तसेच वही मंडळ कार्याचे आजच्या पिढीसाठीचे महत्व विशद केले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव धनगर यांनी तर प्रास्ताविक बाळू पाटील यांनी केले प्रास्ताविकात योगायोग वही मंडळांने केलेल्या ४० वर्षाचा समाज जनजागृतीचा स्तुत्य लेखाजोखा मांडण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिका न्याहाळदे,लक्ष्मण धनगर, रामभाऊ देशमुख,उत्तम धनगर,रतन कोळी,गोपाळ कोळी,सुनील वासुदेव बारी, प्रमोद गडे,तुकाराम रघुनाथ बारी,जगदीश बारी,शरद यादव, कैलास नरसाळे,सचिन कोळी, शशिकांत यादव,प्रल्हाद पाटील,संजीव पाटील,विठ्ठल बारी,अशोक पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमात उपस्थितांचे आभार गोकुळ बारी यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!