यावल (सुरेश पाटील) आज बुधवार दि.२७ रोजी यावल येथील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आई हॉस्पिटलच्या शेजारी डॉ.कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवारातर्फे नागरिकांकरिता खास मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]
सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ५ पर्यंत आयोजित शिबिरात यावल शहर व तालुक्यातील तब्बल ७५६ नागरिकांनी आपआपली नोंदणी केली व त्यांना मोफत कार्ड वितरण करण्यात आले.यावल शहरात भुसावळ रस्त्यावर आई हॉस्पिटल आहे. [ads id="ads2"]
या हॉस्पिटलच्या शेजारी डॉ. कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराकडून मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी व कार्ड वितरण शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यात यावल शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती देऊन आपापली नाव नोंदवली आणि तब्बल ७५६ नागरिकांना या ठिकाणी मोफत आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करून कार्ड बनवून वितरण करण्यात आले.सदर शिबिरात भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ.कुंदन फेगडे,युवा शहराध्यक्ष रितेश बारी,परिष नाईक,सागर लोहार,मनोज बारी आदींची उपस्थिती होती.सकाळ पासुन या शिबीरात नोंदणी करीता नागरीकांनी मोठी गर्दी करून रांगेत आपले नंबर लावून नोंदणी करून घेतली.



