सरपंच, ग्रामसेवक ,कर्मचारी, ग्रामरोजगार,संगणक परिचालकांचे निंभोरा येथे ग्रामपंचायत बंद आंदोलनात संयुक्त निदर्शने

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


२० डिसेंबरला जिल्हाधिकारी व तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन दया !सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडेंचे आवाहन

  राज्यातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक सोमवारपासून तिन दिवसीय कामबंद आंदोलनामुळे संपावर आहेत.[ads id="ads1"]

      रावेर तालुक्यातील निंभोरा येथे सर्वच संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकत्र येत संयुक्त निदर्शने केली. पंचायतराज विकास मंच संचालित अ.भा.सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन, संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना अशा गावगाडा चालवणाऱ्या प्रमुख घटकांनी एकत्रित येत राज्यभर ग्रामपंचायत बंदची हाक दिली होती. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस  विवेक ठाकरे, जिल्हाध्यक्ष  वासुदेव नरवाडे, माजी सरपंच डीगंबर चौधरी, जिल्हा अपाध्यक्ष सरपंच सचिन महाले, बलवाडी सरपंच जितेंद्र महाजन, विवरे सरपंच युनूस तडवी, निंभोरा सिम सरपंच अनिल कोळी, उपसरपंच उमेश वरणकर, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल लोखंडे, सचिव अतुल पाटील, महिला अध्यक्षा छाया नेमाडे, ग्रामसेवक गणेश पाटील, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रल, जिल्हा सचिव राहुल महाले, निंभोरा ग्रामपंचायत सदस्य सतिष चौधरी, दस्तगीर खाटीक, मधुकर बिऱ्हाडे, दिलशाद शेख, मनोहर तायडे, अमोल खाचणे, भानुदास महाजन (विवरे ) , मंदाकिनी ब-हाटे, अकील खाटीक, ललित कोळंबे आदी सहभागी झाले होते.[ads id="ads2"]

२० डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत बंद आंदोलनाची दखल घ्यावी व गावगाडा चालवणाऱ्या सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक,कर्मचारी,संगणक परिचालक व ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या मान्य  व्हाव्यात. म्हणून 20 डिसेंबर रोजी (बुधवारी) बंदच्या शेवट च्या दिवशी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याला तहसीलदार यांना दुपारी १ वाजता मागण्यांचे निवेदन द्यावे.मागण्या मान्य न झाल्यास येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रालयावर सर्वांचा  संयुक्त 'गावखेड्यांचा अपेक्षा मोर्चा' काढण्यात येईल, असे आवाहन सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे, ग्रामसेवक युनियन जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोरडे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष विजय रल, संगणक परिचालक जिल्हाध्यक्ष प्रमोद चौधरी आणि ग्रामरोजगार सेवक जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!