रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील विवरे खु येथील ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील यांनी मजूर न लावताच काम केलेले असल्याने त्यांची पुराव्यानिशी केलेल्या तक्रारींची रावेर पंचायत समिती प्रशासन चौकशीच करीत नसल्याने आज पंचायत समिती रावेर येथील ग्रामसेवक सभेत अतिरिक्त सी इ ओ यांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती तक्रारदार नजमुद्दीन शेख यांनी दिली आहे.[ads id="ads1"]
सन २०२०-२१ व २०२१- २२ या वर्षी ग्राम विकास अधिकारी तथा स्वयं घोषित ग्रामसेवक संघटनेचे सचिव अतुल पाटील यांनी मजुरच न लावल्या प्रकरणी तक्रार आहे ; मात्र पंचायत समिती रावेर स्तरावर चौकशीच होत नसल्याने आज जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे नजमुद्दीन शेख यांना बोलताना सांगितले आहे.