रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस हद्दीतील अवैद्य धंदे दारू सट्टा पत्ता लवकरात लवकर बंद झाले पाहिजे. असे निवेदन निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय( API) हरिदास बोचरे यांना आज दिनांक 13 /12 /2023 या रोजी देण्यात आले. [ads id="ads1"]
निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील दारू ,सट्टा ,पत्ता बऱ्याच वर्षापासून खूप जोरात चालू आहेत.याच्यावर वचक पोलिसांचा काहीच दिसून येत नाही. या अवैद्य धंद्यामुळे गरीब कुटुंबांचे खूप हाल होत आहेत. त्यांच्या बायका सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत १५० ते २०० दीडशे ते दोनशे रुपये रोजंदारीवर काम करीत असतात आणि त्यांचे पुरुष त्यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांच्या मिळकतीच्या कमाईचे सर्व पैसे घेऊन सट्टा पत्ता आणि दारू मध्ये खर्च करून टाकतात. [ads id="ads2"]
त्यामुळे संध्याकाळची चूल सुद्धा त्यांच्या घरी व्यवस्थित पेटत नाही. याला सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन आहे .असे नागरिकांकडून म्हटले जात आहेत तसेच ऐनपुर खीरडी येथील सट्टा पिढी व निंबोल, खिर्डी ,निंभोरा ,तांदलवाडी ,विवरा, मंगलवाडी, विवरा ते सांगव्यापर्यंत धाब्यांवर देशी, विदेशी दारू ,व तेथील पत्त्याचे क्लब .असे सर्व अवैद्य धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे, असा इशारा निवेदन स्वरूपात वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने आज दिनांक 13 /12/ 2013 रोजी निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे साहेब यांना देण्यात आले.
तसेच अवैद्य धंदे लवकरात लवकर बंद न झाल्यास, वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल .याला सर्वस्व जबाबदार ,सर्वस्व पोलीस प्रशासन राहील असा इशारा पोलीस उपनिरीक्षक (API) साहेब हरिदास बोचरे ,यांना यावेळी देण्यात आला.
त्या ठिकाणी उपस्थित महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई सोनवणे, सायरा संजय कोसुरे महिला आघाडी तालुकाध्यक्ष.पदाधिकारी, व कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते.