जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २२३०९ वाढली : निवडणूक विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची फलश्रुती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


पुरूषांबरोबर तृतीयपंथी मतदार ही वाढले

 जळगाव, (राहुल डी गाढे) - जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत वाढली आहे. ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत १६ लाख ५७ हजार ७६ महिला मतदार संख्या होती. २३ डिसेंबर २०२३ च्या मतदार नोंदणी आकडेवारनुसार जिल्ह्यात १६ लाख ७९ हजार ३८५ महिला मतदार आहेत. मागील १२ महिन्यात महिला मतदारांमध्ये २२३०९ ने वाढ झाली आहे. तर याच कालावधीत पुरूष मतदारांमध्ये १४८८९ ने वाढ झाली आहे.[ads id="ads1"]

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी मागील काही महिन्यात महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन केले. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवात मतदार नोंदणी बाबत जनजागृती करण्यात आली‌. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त दुर्गम अशा सातपुड्याच्या आदिवासी भागात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये नवमतदारांसाठी शिबिरांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर कालावधीत ग्रामसभांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात १८ वर्षापूढील नवमतदारांसाठी नोव्हेंबर २०२३ या महिन्यात ४ विशेष शिबीरे घेण्यात आली. १८ व १९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर विद्यार्थीनींनी, महिला, दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मतदार नोंदणी वाढावी यासाठी रॅली, पोस्टर, बॅनर व सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार -प्रसार करण्यात आला.[ads id="ads2"]

जळगाव शहर, ग्रामीण, जामनेर व रावेर मध्ये महिला मतदार सर्वाधिक वाढले

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात ५ जानेवारी २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्यानुसार जळगाव शहरात  १ लाख ७५ हजार ८०१ मतदार होते. यात मागील १२ महिन्यात ७६८६ मतदारांची वाढ होत आता १ लाख ८३ हजार ४८७ मतदार झाले आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये १ लाख ५० हजार ५४ मतदार होते. यात ३९९५ मतदारांची वाढ होत आता १ लाख ५४ हजार ४९ मतदार झाले आहेत. जामनेरमध्ये १ लाख ४९ हजार ६०६ मतदार होते. यात ३४१३ मतदारांची वाढ होत आता १ लाख ५३ हजार १९ मतदार झाले आहेत. रावेरमध्ये १ लाख ४० हजार ८३५ मतदार होते. यात २८५७ मतदारांची वाढ होत आता १ लाख ४३ हजार ६९२ मतदार झाले आहेत. त्याखालोखाल चोपडा,अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा व मुक्ताईनगर या मतदार संघाचा नंबर लागतो.‌

तृतीयपंथी मतदार वाढले

जिल्ह्यात २ व‌ ३ डिसेंबर रोजी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदार नोंदणीचे विशेष शिबीरे घेण्यात आली. यामुळे तृतीयपंथीय मतदारांची संख्याही ११ मतदारांने वाढली आहे. ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यात १२३ तृतीयपंथीय मतदार होते. आता १३४ तृतीयपंथीय मतदार आहेत. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव शहर व चाळीसगाव मध्ये सर्वाधिक अनुक्रमे ३७, ३३ व ३० तृतीयपंथीय मतदार आहेत.

"राज्यात नऊ डिसेंबरला मतदार नोंदणी मुदत संपली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने नऊ डिसेंबरनंतरही मतदार नोंदणीची संधी दिली आहे. यासाठी अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त नवमतदारांनी ऑफलाईन किंवा व्होटर रजिस्टर अॅपच्या मदतीने लवकरात लवकर नोंदणी करावी" असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!