रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) : स्नेहसंमेलन कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष श्री सिताराम दयाराम पाटील शिक्षक (डॉ. सी. आर पाटील माध्यमिक विद्यालय मोरगाव) , प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री अमित भंगाळे- आनंद हॉस्पिटल आणि डायलिसिस युनिट नेफ्रोलॉजिस्ट जळगाव , डॉक्टर दीपक एम पाटील - सिनियर रहिवासी शासकीय रुग्णालया जळगाव , श्री हरिदास बोचरे - ए.पी.आय निंभोरा पोलीस स्टेशन.शाळेचे प्रशासक- श्री महेंद्र दयाराम पाटील , सचिव- सौ.संगिता महेंद्र पाटील , डॉ. पियूष महेंद्र पाटील पर्यवेक्षक -श्री मिलिंद दोडके , शिक्षक वृंद तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.[ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणेश पूजन, सरस्वती पूजन तसेच गीताजयंतीचे औचित्य साधून गीतापूजन करण्यात आले. गीतापूजन प्रसंगी श्रीकृष्ण वेशभूषेत -वेदांत नरेंद्र पाटील ,अर्जुन वेशभूषेत- अश्विन अतुल कुलकर्णी यांचे आकर्षण ठरले.
. तद्नंतर शाळेचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.[ads id="ads2"]
खरे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही म्हणून स्नेहसंमेलनामुळे शैक्षणिक विकासासह मुलांचा कलागुणांचा ही विकास होतो. आपला सभाधिटपणा हा गुण आत्मसात होतो. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास हा स्नेहसंमेलनातून मिळतो .मोठ मोठ्या कलाकारांच्या कारकिर्दीचा पाया शालेय जीवनात होणाऱ्या स्नेहसंमेलनातूनच घातला गेला आहे . आपल्या अंगच्या कलागुणांची ओळख स्नेहसंमेलनातूनच होते.
विद्यार्थ्यांचे मुक्त कलाविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन ! उपजत कलागुणांनी विद्यार्थ्यांना स्वतःची नव्याने ओळख करून देते ते म्हणजेच स्नेहसंमेलन ! स्नेह, समर्पण, समरसता व एकजुटीची भावना वाढीस लावते स्नेहसंमेलन !
अशा नानापरी छटा अंगीभूत असणारा व उत्साहाने ओतप्रोत वाहणारा सोहळा म्हणजेच स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा परिचय शिक्षक श्री मिलिंद दोडके यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
इयत्ता नर्सरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीनी मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलनात सहभाग घेतला.त्यात नृत्य, कोळीगीत ,भक्तीगीत, लावणी, देशभक्ती गीत, बालगीत , समाजप्रबोधनपर नाटक इत्यादी बहारदार कार्यक्रमांचा कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केला.आपल्या लाडक्या मुला मुलींचा कलाविष्कार बघण्यासाठी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात समाजप्रबोधन नाटक सर्वांचे आकर्षन ठरले, तसेच बालगोपाल यांचा कलाविष्कार बघून पालक आनंदी झाले.
स्नेहसंमेलनात अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले कोणतेही यश संपादन करणे कठीण नसते,स्पर्धा परीक्षा तसेच इतर परीक्षेकरिता जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत करण्याची प्रामाणिक तयारी आवश्यक असते, तसेच आव्हानात्मक क्षेत्र असलं तर अभ्यासाचे नियोजन कसं करावं,यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. भाग्यश्री पाटील, सौ. करुणा सुतार व आभार प्रदर्शन शिक्षक श्री डिंगबर चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.