भरवस्तीतून उच्च दाब वीज वाहिन्या हटविण्यात यावे - सावदा येथील रजानगरातील नागरिकांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


"सावदा पालिका हद्दीतील गट नं.१३५१ यास बिनशेती कामी नियम अटींवर सावदा पालिकेने तात्पुरती परवानगी दिल्याचे समजते.तरी अशा ठिकाणी जर उच्च दाब वीज वाहिन्या गेल्या असेल तर ते हटविण्याची जबाबदारी ले-आऊट मालकाची असते.पंरतू येथे अशा उच्च दाब विज वाहिन्या टाकण्याचा उलट व चुकीचा प्रकार या ले-आऊट मालकाकडून होणे.ही बाब पुर्णपणे समजण्या पलिकडची आहे."

---------------------------------------------------------  

सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)

सावदा :- येथील रजानगर लागत असेलेले संपूर्ण गट नं.१३५१ मध्ये एका भुसावळ येथील प्लाटस विक्रीचा कारभार करणाऱ्या व्यक्तीने सावदा न.पा.हद्दीत गट नं.१३५१ मध्ये नविन ले-आऊट टाकलेले असून,त्यानी स्व:ताच्या आर्थिक हित जोपासण्याकरिता की,काय?रजानगर या रहिवासी भागातून सरासरी ११ हजार पावरच्या उच्च दाब वीज वाहिन्या अवैधरित्या पोल लावून टाकत असल्याचा प्रकार समोर आला आहे.[ads id="ads1"]

 या उच्च दाबाच्या विज वाहिन्या थेट शहरातील रजानगर सह गट नं.१३५३/२,१३५३/३+१३४९+१३७१ येथील रहिवासी लोकांच्या घरा समोरुन अल्पशा अंतरावरून  विज पोल उभे करून दि.२२ डिसेंबर रोजी टाकण्यात येत असताना येथील सर्व रहिवासीशांनी या गोष्टीचा वेळेवर विरोध करुन काम बंद पाडले.आणि त्याच दिवशी याबाबत थेट सावदा विज वितरण विभागात जाऊन संबंधित अधिकारीस समक्ष भेटून तक्रार दाखल केली आहे.रहिवाशांनी तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही राहत असलेल्या भागात अशा उच्च दाबाच्या विज वाहिन्या व पोल त्वरित हटवून या भागातील लोकांची जीवित व वित्त हानी टाळावी.अन्यथा यामुळे येथील रहिवासीयांचे जीवाचे काही बरेवाईट झाले तर संबंधित अधिकारी सह विज वितरण विभागच जबाबदार राहील.तसेच या तक्रार अर्जवर शेख जावेद शेख रऊफ,अ.हमीद अ.रऊफ,युनूस रहिम खाटीक,वली मोहुम्मद पिंजारी सहीत अनेक रहिवाशांच्या सह्या दिसत आहे.[ads id="ads2"]

या प्रकरणी घटना स्थळी जाऊन चौकशी केली असता सदरील प्रकार घडला असून,या नविन गट नं.१३५१ मध्ये ३ हजार व त्यापेक्षा अधिक स्केअर फुटांचे एकूण मोठमोठे ११ भुखंड दिसत दिसून येते.त्यात जि.प.अंर्तगत नियोजीत ८० फुटाचा रस्ता जात असून या रस्त्याची मोजणी केली असता त्याचे दोन्ही बाजूला दोन- दोन फूटांच्या गटारी सह या रस्त्याचे मधोमध तीन फुटांचे डिव्हायडर सुद्धा दिसत आहे.यामुळे सदरील रस्त्याची रुंदी ८० फुट ऐैवजी फक्त ७३ फुट इतकीच प्रथमदर्शनी दिसून येते.तरी अशा शासकीय रस्त्याचा देखील आर्थिक लाभ भुसावळ येथील भूखंड विक्रीचे व्यवसाय करणारा व्यक्ती उचलत असल्याचे उघड होत आहे.तरी याकडे सावदा पालिकेचे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे व न.पा.नगर रचना साहयक यांनी जातीने लक्ष देऊन तात्काळ योग्यती चौकशी करून यागटास तात्पुरती दिलेली बिनशेती कामी परवानगी रद्द करावी.अशी अपेक्षा  व्यकत केली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!