ऐनपूर : येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण:२०२० परिसंवाद आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. [ads id="ads1"]
सदर परिसंवादाच्या उद्घाटनाच्या कार्याक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. भागवत विश्वनाथ पाटील, अध्यक्ष, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ यांनी भूषविले. व्यासपीठावर श्री. श्रीराम नारायण पाटील, चेअरमन, श्री. रामदास नारायण महाजन, उपाध्यक्ष, श्री. संजय वामन पाटील, सचिव आणि सर्व सदस्य, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, ऐनपूर तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य आणि प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने उपस्थित होते. सुरवातीला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन आणि लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले.[ads id="ads2"]
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिसंवाद कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ श्याम जीवन साळुंखे, अप्पासाहेब रघुनाथ बाबुराव गरुड,कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, शैन्दुर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख मार्गदर्शक प्रा. श्याम जीवन साळुंखे यांचा परिचय डॉ. सतीश ए. पाटील यांनी करून दिला. त्यानंतर प्रा. श्याम जीवन साळुंखे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: तत्व आणि संभावना या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात नवीन शैक्षणिक धोरण:२०२० विस्तृतपणे सांगितले. या धोरणाचा उद्देश भारतातील शिक्षण प्रणालीला पुनर्रचीत करून ती अधिक आधुनिक, प्रभावी आणि सर्वसमावेशक बनवणे तसेच भारताला ज्ञान आणि कौशल्य प्रचंड असलेल्या राष्ट्रामध्ये रूपांतरित करणे व भारताला एक ज्ञानप्रधान आणि कौशल्यपूर्ण समाज बनवणे हा आहे असे सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. त्यानंतर उपस्थितांशी हितगूज करतांना त्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कल्पना,उद्दिष्टे आणि अंमलबजावणी याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे सांगितले. श्री. रामदास नारायण महाजन, उपाध्यक्ष, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ,यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० हे भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जे भारतातील शिक्षणाला नवीन दिशा देणारे आहे असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. एस. बी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. हेमंत बाविस्कर, प्रा. संजय महाजन, डॉ. जयंत नेहेते, प्रा. प्रवीण महाजन, प्रा. सुनील इंगळे, प्रा. रामटेके, प्रा. मुळे, प्रा. तायडे, प्रा कोळी आणि सर्व प्राध्यपक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले