एक व्यक्ती एक पद निर्णय घेतला तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते..?
छाननी मध्ये संपूर्ण अर्ज वैध: आता माघार कोण घेणार..? याकडे लक्ष वेधून
यावल ( सुरेश पाटील ) यावल तालुका खरेदी विक्री संघाची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना पंचवार्षिक निवडणुकीत एकूण ८८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले, आज दि.९ रोजी छाननी करताना सर्व अर्ज वैध ठरविण्यात आल्याने आता २४ जानेवारी २०२४ पर्यंत कोण कोण आपले दाखल नाम निर्देशन पत्र माघार घेणार ..? किंवा निवडणूक बिनविरोध होते का..? याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"]
४ फेब्रुवारी २०२४ रोजी यावल खरेदी विक्री संघाच्या निवडणुक रिंगणातील उमेदवारांसाठी मतदान होणार असले तरी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम दि.२४ जानेवारी २०२४ आहे.यावल तालुका खरेदी विक्री संघाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कोण कोण माघार घेणार..? तसेच निवडणुकीत सहकारात राजकारण नको म्हणून एक व्यक्ती एक पद असा फार्मूला राबविला गेल्यास नवीन इच्छुकांना संधी मिळू शकते.निवडणुकीत जिल्हा बँकेसह सहकार क्षेत्रात इतर ठिकाणी संचालक जे आहेत त्यांनी पुन्हा यावल खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाग घेतल्याबाबत सुद्धा तालुक्यात सहकारात,राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सहकार हिताच्या दृष्टिकोनातून एक व्यक्ती एक पद असा निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. अशी संपूर्ण यावल तालुक्यात चर्चा आहे.[ads id="ads12"]
यावल खरेदी विक्री सहकारी संघाची ४ फेब्रुवारीला १७ संचालक पदासाठी निवडणूक होत आहे.मतदार २ हजार ८७३, तसेच सहकारी सोसायटीचे मतदार ४८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.यात प्रामुख्याने नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्यांमध्ये शेतकरी संघाचे विद्यमान अध्यक्ष अमोल सूर्यकांत भिरूड यांच्यासह विद्यमान संचालक प्रभाकर आप्पा सोनवणे,( यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ) जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पाटील. विद्यमान संचालक सुनील बाळकृष्ण नेवे,नरेंद्र नारखेडे, तुषार उर्फ मुन्ना सांडूसिंग पाटील,भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे,जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेश गिरधर नेहेते, नितीन नेमाडे,यशवंत तळेले, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत चौधरी,तेजस पाटील, भारती चौधरी,नीतिजा किरंगे, कला वाणिज्य विद्यालयातील प्राध्यापक तथा विद्यमान तज्ञ संचालक डॉ.हेमंत येवले,लहू पाटील,माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष मुकेश येवले यांचा समावेश आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदकिशोर मोरे हे कामकाज पाहत आहे.