यावल ( सुरेश पाटील ) भारतीय जनता पार्टी आगामी विधानसभा लोकसभा निवडणुका लक्षात घेता यावल तालुकाध्यक्ष नियुक्ती नुकतीच जाहीर केली परंतु यावल शहराध्यक्ष निवड करताना पक्षश्रेष्ठीकडून आपल्या भारतीय जनता पार्टीचे ध्येय उद्दिष्ट यांना तिलांजली देत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षाचे निष्ठावंत नसलेल्या कार्यकर्त्यांला संधी देण्याचा घाट वरिष्ठ नेत्यांमध्ये रचला जात असल्याचे यावल शहरात राजकारणात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
लोकांच्या सतत संपर्कात राहणारा,गेल्या चार-पाच वर्षापासून पक्षासाठी झटणारा, पक्षाच्या विविध कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यास भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास, किंवा पुनश्च संधी दिल्यास यावल शहरातील जनता त्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाही आणि नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास त्याचे विपरीत परिणाम सुद्धा पक्षाच्या कामकाजात दिसून येतील असे यावल शहरात बोलले जात आहे.