भुसावळ (फिरोज तडवी)
येथील आयुध निर्माणी भुसावळ येथे ४ दिवसीय सांखळी उपोषणास सुरवात झाली. जुनी पेंशन लागु करणे या एकमेव मागणीसाठी स्थापित JFROPS (जॉइंट फ्रंट रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेंशन) चे आदेश व AIDEF चे निर्देशानुसार दि.८ ते ११ जानेवारी २०२४ दरम्यान देशतील केंद्रीय कर्मचारी संस्थानांसमोर साखळी उपोषण करून जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी सरकारचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.[ads id="ads1"]
साखळी उपोषणात संरक्षण, रेल्वे, टपाल, इंकमटैक्स सह अन्य केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. सरकारने JFROPS पदाधिकारी यांचेशी वेळोवेळी चर्चा केल्या नंतर ही सरकार कोणतीही ठोस भुमिका घेत नसल्याने १ जनेवारी २००४ पासुन भर्ती कर्मचाऱ्यांना शेअर मार्केट वर आधारित नवी पेन्शन ऐवजी गॅरेंटेड जुनी पेंशन देण्यास सरकारची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे देशातील केंद्रीय कर्मचा-यांत कमालीचा असंतोष आहे. त्याचाच साखळी उपोषण हा एक भाग असुन येणाऱ्या काळात जुन्या पेन्शन या एकमेव मागणीसाठी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे कॉ. दिनेश राजगिरे जेसीएम मेंबर यांनी सांगितले. [ads id="ads1"]
AIDEF चे आदेश नुसार येथील ऑ फॅ कामगार युनियन द्वारे उपोषणास सुरवात झाली असून दिनेश राजगिरे, निलेश देशमुख, आशिष मोरे, किशोर बढे, मोहन सपकाळे, मिलेश देवराळे, योगेश आंबेडकर, पंकज सोनार यांनी उपोषणात सहभाग घेतला. युनियनचे अध्यक्ष कॉ महेंद्र पाटिल, मोहम्मद आरिफ, नाना जैन, योगेश जोशी, संतोष बाविस्कर, शेख शकील, राजु तडवी, प्रमोद तायडे, तुषार नाईक, हरीश बाविस्कर, संकेत तायडे, रवी सपकाळे, अर्बाब फारुकी, रजकिरण निकम, राजेंद्र बादशाह हे प्रमुख उपस्थित होते.
युनियन चे महासचिव व जेसीम-३ चे कॉ दिनेश राजगिरे यांचे नेतृत्वात उपोषण होत असून कॉ सी श्रीकुमार महासचिव AIDEF यांचे मार्गदर्शन लाभत आहे.