फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त 21 जणांना समाज रत्न पुरस्कार वितरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी) 

 येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजित फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 21 जणांना समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि प सदस्य शरद दादा महाजन  हे होते कार्यक्रमाची सुरुवातीला नरेंद्र नारखेडे यांनी थोडक्यात आपल्या भाषणात पत्रकारांच्या अशा चांगल्या कार्याबद्दल गौरव केले.[ads id="ads1"]

  तसेच अध्यक्षस्थानी असलेले माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या परिसरातील पत्रकारांची कार्य खूपच महत्त्वाचे आहे म्हणूनच पत्रकारांनी समाजात चांगली कामगिरी करणाऱ्या 21 जणांना समाज रत्न पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी पत्रकारांची कौतुक केले तसेच अध्यक्ष स्थान यावरून शरद दादा महाजन यांनी आपल्या भाषणात म्हणाले की खरोखरच या परिसरातील पत्रकारांचे कार्य  कौतुक करणारे असून पत्रकारांनी गेल्या कार्यकाळात कैलासवासी लोकसेवक मधुकरराव चौधरी तसेच कैलासवासी माजी  गृहराज्यमंत्री महाजन यांचे कार्यकाळात पत्रकारांची सुद्धा अनमोल असे कार्य राहिले.[ads id="ads2"]

   त्यामुळे या रावेर यावल तालुक्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि आणि मधुकर सहकारी साखर कारखाना चालू असताना अनेक घडामोडी घडल्या त्यावेळेस सुद्धा पत्रकारांनी सुद्धा पारदर्शक पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेसमोर आणून एक चांगले उदाहरण या रावेर यावल तालुक्यात जनतेसमोर ठेवले म्हणूनच या परिसरातील पत्रकारांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमात फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे जे समाजात गरजू लोकांच्या समस्या जाणून घेऊन मदत करतात अशा 21 जणांना या पत्रकार संघातर्फे समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहे ग्रामसेवक बाळू अप्पा वायकोळे फैजपूर डॉक्टर मोहन साळुंके  न्हावी डॉक्टर दानिश शेख फैजपुर एडवोकेट नितीन भावसार फैजपूर तोहसीफ खाटीक कौसर शेख  फैजपूर एडवोकेट स्वप्निल सोनार निंभोरा तालुका रावेर पोलीस कर्मचारी योगेश दुसाने फैजपूर सुरेश पाडवी सर मुक्ताईनगर निलेश पाडवी सर मुक्ताईनगर पंकज बारी इंजिनियर यावल स्वप्निल बोरसे उद्योजक यावल असलम तडवी सर धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर असलम तडवी सामाजिक कार्यकर्ते फैजपूर पिंटू तेली सामाजिक कार्यकर्ते फैजपूर अरमान  तडवी महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार म्हणून सावद्याचे भानुदास भारंबे राजेंद्र पाटील सावदा वासुदेव सरोदे फैजपूर अरुण होले फैजपूर करुणा राहुल पाटील सावदा अशा 21 जणांना फैजपूर परिसर पत्रकार संघाच्या वतीने समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व्यासपीठावर नरेंद्र नारखेडे माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे राजू  इंजिनियर कुरबान शेख माजी नगरसेवक महेबूब पिंजारी मा नगरसेवक मनोज कापडे पीएसआय सय्यद पीएसआय लोखंडे एडवोकेट कैलास शेळके चंद्रशेखर चौधरी केतन किरंगे शरीफ सर आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश खाचणे यांचे प्रतिनिधी किरण पाटील सद्गुरु हॉस्पिटलचे डॉक्टर अमित हिवराळे तसेच गजानन हॉस्पिटलचे अभिजीत सरोदे आणि संजीवनी हॉस्पिटल चे डॉक्टर दिलीप भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी फैजपूर परिसर पत्रकार अध्यक्ष सलीम पिंजारी उपाध्यक्ष राजू तडवी तसेच या कार्यक्रमाला फैजपूर येथील पत्रकार फारुक शेख योगेश सोनवणे इदु पिंजारी प्राध्यापक राजेंद्र तायडे शाकीर मलिक संजय सराफ दिलीप सोनवणे आधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव सर यांनी केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!