रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सविस्तर वृत्त असे मोयखेडा दिगर तालुका जामनेर जि. जळगांव येथिल बौध्द सरपंच पती समाधान मेढे यांची संशयास्पद हत्या करण्यात आली असून आजपर्यंत 8 ते 10 दहा दिवस होऊन ही समाधान मेढे यांच्या हत्या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने सदर गुन्हयातील आरोपी विरोधात तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेच बौध्द समाजावर जळगाव जिल्ह्यात अन्याय अत्याचार होत आहे या अनुषंगाने निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने दि. 29/01/2024 वार सोमवार रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेर येथे ठीक 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी रावेर तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी हजर रहावे अशी विनंती निळे निशाण सामाजिक संघटने तर्फे करण्यात आली आहे.



