"काथ" बाजारात आणि चुना लावला जातो शासनाला
१० गाड्या रवाना आणि एक गाडी पकडली जाते ?
यावल ( सुरेश पाटील)
यावल पूर्व व पश्चिम वन विभागात अधिकारी,कर्मचारी यांच्या संगनमताने सागवानी लाकडा सह खैर लाकडाची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू
यावल वन विभागातील यावल येथील पूर्व व पश्चिम वन विभागात खैर लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून मौल्यवान अशा खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या १० वाहनामागे फक्त १ वाहन पकडण्याचा देखावा वन विभागाकडून होत असल्याने मूल्यवान "काथ" बाजारात आणि शासनाला कोट्यावधी रुपयाचा चुना लावण्याचा प्रकार सातपुड्यात होत असल्याचे उघड उघड बोलले जात आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की जानेवारी २०२४ महिन्याच्या सुरुवातीला यावल पश्चिम वन विभागात अवैध खैर लाकडाचे वाहतूक करतानाचे बोलोरो वाहन वन विभागाने पकडले होते आणि आहे त्यानंतर पूर्व वन विभागात न्हावी बोरखडे परिसरात गेल्या आठवड्यात मोटरसायकल वरून "खैर"लाकडाची वाहतूक करताना मोटरसायकल पकडली.या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाले की आरोपींना फरार करण्यात मदत करण्यात आली..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.[ads id="ads2"]
सध्या सातपुडा कार्यक्षेत्रात आणि अभयारण्य परिसरात खैर लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे "खैर"व सागवानी लाकडाची तस्करी करणारे यावल - रावेर तालुक्यात ठीक ठिकाणी आहेत,कोणाचे लाकडाचे व्यवसाय आणि काही फर्निचरची दुकानी कुठे आहेत त्याची माहिती सुद्धा वन विभागाला आहे यापैकी ज्यांचे नियमित मासिक आपटे आहे त्यांचा म** पकडला जात नाही आणि जे हप्ते देत नाहीत त्यांचा माल कारवाईच्या नावाखाली पकडला जातो याप्रकारे वनविभागाची कारवाई सुरू आहे. अवैध सागवानी लाकडाची आणि खैर लाकडाची तस्करी करणाऱ्या अनेक आरोपींना अटक होत नाही तर काही फरार होतात या मागचे कारण काय..? डोंगर कठोरा परिसरातील आरोपी कष्टडीत ताब्यात असताना यावल पोलीस स्टेशन आवारातून पळून गेले आणि ते आरोपी अद्याप पकडले गेले नाही याला जबाबदार वन विभागातील अधिकाऱ्यावर गेल्या वर्षभरात काय कारवाई झाली..? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. यावल वन विभागातील यावल पूर्व व पश्चिम वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे असे आता बोलले जात आहे.
खैर लाकडाचे महत्व-
खैर,कैर,काथ,खदिर ह्यां नावाने ओळखल्या जाणाऱ्या झाडाचे शास्त्रीय नाव आकाशीय कँटेच्यु असून मायमोसेसी(बाभूळ,शिरीष,लाजाळू) ह्या कुळात झाडाचं समावेश आहे.अंदाजे 10 मीटर उंचीचे ह्या झाड असते, जवळपास शमी आणि खैर अनोळखी ना सारखेच दिसतात,लक्षपूर्वक पाहिल्यास झाड ओळखू येते.आयुर्वेदात खैरास महत्वाची औषधी वनस्पती अशी मान्यता आहे ,अजूनही खेड्यातून खोल जखम,अनियमित पाळी, पायाला भेगा पडणे ह्या आजारांवर खैराचे सालीचा उपयोग करतात. वाळ लेला काथ लिंबाचे फोडीस चोळून हे औषध अंश्या पोटी घेतल्यास मूळ व्याध बरी होते. वैद्य ह्या बाबत यथायोग्य शास्त्रीय माहिती देऊ शकतील आणि त्यांचे देखरेखीतच उपचार घेणे कधीही योग्य.खैराचे उष्मांक मूल्य उच्च असते व लाकूड अतिशय कठीण मजबूत, चिवट आणि टिकाऊ असते .लाकडाच्या तेलघानी व शेती अवजारे बनवण्यास ह्याचा उपयोग होतो.हल्ली झाडास फुलोरा आलेला आहे, नंतर पिंगट तपकिरी चपट्या शेंगा लागतात शेंगां झाडास नसल्या मुळे फोटो उपलब्ध झाला नाही.बाभळी सारखे खैराचे झाड कुठेही,खडकाळ, उजाड,उंचसखल भागात सहज रुजते.बिया पासून सहज रोप तयार होतात ,वनीकरण विभागात पण भेटू शकतात.शमी प्रमाणे खैर सुद्धा नत्र स्थिरीकरणाचे व जमिनीचा पोत सुधारण्याचे काम करतो.
माझे घरी ह्याचे लकडा पासून काथा बनवलेला मी पाहिला. खैराचे लाकडं तोडून मोठ्या गंजात पाणी टाकून लाकडं उकडत ठेवायचे पाणी घट्ट होई पर्यंत उकडत ठेवायचे ,कथ्यां रंगाचा काथ सुकवून तयार होत असे.आता पान व काथ खाणारे कमी झाले त्याची जागा विषारी तंबाखू गुटखा,खर्याने घेतली. काथा खैरा पासून बनतो हे पुढच्या पिढीला कळणार सुद्धा नाही.
धार्मिक माध्यमातून झाड टिकून राहावी व झाडाचे संवर्धन व्हावे ह्या उद्देशानेच राशी आणि ग्रहा सोबत त्यांचे वृक्ष जोडलेले आहेत जेणे करून त्या राशी चे व्यक्ती ते झाड रुजवून संवर्धित करतील खैर वृश्चिक राशी व मंगळ ग्रहाचा आराध्य वृक्ष आहे. हिंदू बौद्ध धर्मात झाडाला पवित्र वृक्ष मानतात यज्ञात स्तंभ म्हणून ह्या वृक्षशाचे खांब उभारल्या जायचे,तसेच जातक कथा मधे ह्या झाडाच्या कथा आलेल्या आहेत
संकलन:धनंजय मिसाळ महावितरण नांदुरा ,फोटो सह माहिती शेअर करण्यास सर्व खुले आहेत.तुमच्याही नावाने शेअर केल्यास हरकत नाही फक्त झाडाची माहिती व संवर्धन व्हावे एवढाच उद्देश धन्यवाद



