जळगाव जिल्ह्यातील दुय्यम निरीक्षक सतीश पाटील यांची बदली
महसूल,पोलीस,मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा..?
यावल (सुरेश पाटील)
महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दि.२९ जानेवारी २०२४ रोजी स्वग्राम असलेल्या जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले त्यात जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागातील दुय्यम निरीक्षक सतीश कैलास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्यात मे. प्रथम हिरा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (आशिष वाईन्स) या ठिकाणी बदली करून पदस्थापना दिली आहे.[ads id="ads1"]
स्वग्राम असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी बदलीचे आदेश फक्त राज्य उत्पादन शुल्क विभागातील आहेत याप्रमाणे आपल्या जळगाव जिल्ह्यात महसूल,पोलीस, आणि मुद्रांक विभागातील म्हणजे नोंदणी उपमहा निरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्या विभागातील जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा होणार..? याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads2"]
तसेच जळगाव जिल्ह्यात महसूल,पोलीस,नोंदणी महा उप महानिरीक्षक व मुद्रांक उपनिबंधक,वनविभाग,शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,पंचायत समिती,पाटबंधारे तथा जलसंधारण विभाग इत्यादी विभागासह इतर जिल्ह्यातील जे काही ठराविक अधिकारी, कर्मचारी निलंबित होऊन जळगाव जिल्ह्यात कार्यरत झाले आहेत आणि ज्यांच्या विरोधात लाच लुचपत विभागामार्फत गुन्हे दाखल आहेत किंवा चौकशी सुरू आहेत अशा काही भ्रष्टाचारी गैरकारभारीआणि संबंधितांशी संगनमताने बेकायदा आर्थिक व्यवहार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली होणार आहे किंवा नाही..? याकडे सुद्धा संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील भावी लोकप्रतिनिधीचे,उमेदवारांचे राजकारणासह,समाजाचे विविध संघटनांचे,नागरिकांचे लक्ष वेधून आहे.



