यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यातर्फे, मंगळवारी, संध्याकाळी मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम...
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आदरणीय ब्रह्माकुमारी लतादीदी, रावेर क्षेत्राच्या मुख्य संचालिका , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या...
त्यांनी हळदी कुंकु यावर म्हणालेकी , हळदी कुंकू हे मकरसंक्रांतीपासून ते अगदीं रथ सप्तमी प्रयेंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरु असतात, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती श्रीला घराबाहेर पडायला बंधने होती, पण या हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकत्र येऊन एकमेकींची सुखदुःख जाणुन घेण्याची हळूहळू समाज प्रगत होत गेला तसतशी स्री स्वतंत्र झाली पण तरी हळदी कुंकुची प्रथा आजही सुरु आहे,आलेल्या महिला वर्गाला मेडिटेशन करविले,व आध्यात्मिकतेचा संदेश देवून मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]
संस्थाचा परिचय आदरणीय ब्रह्माकुमारी वैशाली दीदी , रावेर, यांनी दिला.मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन किनगाव येथील छायाताई बियाणे यांनी केलं तर सर्वांचे आभार प्रदर्शन यावल क्षेत्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी राजश्री दीदी यांनी केलं.[ads id="ads2"]
ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, वैष्णवी मोरे, भावना बारी, वर्षांमोरे रागिनी चोपडे ,कल्पना पाटील, पुष्पा नाले, शारदा इंगळे,साक्षी पाटील, सोनम यादव ,कु. श्रुती व यामिनी , दिव्या, प्रीती, कांचन,यांच्या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रीती पार पडला...


