रावेर नगरपरिषदने वाढीव हद्दीतील शांतीदूत नगरात नागरी सुविधा पुरविण्याची नागरिकांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (राहुल डी गाढे) : रावेर , सावदा, फैजपुर  नगर परिषदेची गेल्या 3 वर्षापूर्वी हद्दवाढ झालेली आहे . सावदा व फैजपुर नगर परिषदेच्या हद्दवाढ वाढीव भागात पाणी, रस्ते, गटारी, दिवाबत्ती आदी .नागरी सुविधा पुरविल्या गेल्या परंतु रावेर नगर परिषदेच्या हद्दवाढ कार्यक्षेत्रातील काही विभागात सुविधा पुरविल्या पण शांतीदूत नगरात गेल्या 3 वर्षात कोणत्या ही नागरि सुविधा पुरविल्या नाही याबाबत  80-10 नागरिकांनी  मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांना निवेदन देवून नागरि सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.[ads id="ads1"] 

रावेर नगर परिषदेची हद्दवाढ होवुन 3 वर्ष झाले परंतु या 3 वर्षात  शांतीदूत नगर (डॉ वानखेडे यांच्या दवाखान्याच्या मागे ), हाय वे पासून ते हॉस्टेल कडे जाणारे रस्ते,या भागात पाणी , रस्ते, गटारी, दिवाबत्ती आदी . नागरी सुविधा पुरविल्या गेलेल्या नाही याबाबत 80 नागरिकांनी मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांना निवेदन देवून त्वरीत नागरी सुविधा पुरविण्याची मागणी केली.[ads id="ads2"] 

   यावेळी मुख्याधिकारी यांनी नगर परिषदेकडे निधी उपलब्ध नाही ज्या वेळी निधी उपलब्ध होईल त्यावेळी कामे करण्यात येतील असे सांगितले परंतु शहरातील काही हदवाढ भागा मध्ये  गटारी, रस्ते , पाणी, दिवाबत्ती आदि नागरी सुविधा पुरविल्या गेल्या कशा ? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला तेव्हा मुख्याधिकारी  यांनी डी .पी . डी .सी मधुन करण्यात आले . तर काही भागात कामे होतात तर काही भागात काम नाही असे का ? आदी विषयावर चर्चा होवुन आता यापुढे कामे होतील असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!