यावल ( सुरेश पाटील )
भाजपाच्या ध्येय उद्दिष्टांमध्ये बदल निष्ठावंत कार्यकर्त्याला डावण्याचा डाव असे वृत्त दैनिक साईमत मध्ये प्रसिद्ध होता बरोबर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून यावल शहराध्यक्ष पदाचा निर्णय अजून कोणत्याही स्तरावर घेतला गेला नाही. काही विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे तसेच शहराध्यक्ष निलेश गडे यांनी दैनिक साईमतशी बोलताना सांगितले.[ads id="ads1"]
भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय आणि पक्षाचे ध्येय उद्दिष्ट यांना प्राधान्य देणारा आहे भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्याच्या कामाला आणि दांडगा जनसंपर्क तसेच विविध विकास योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जातो, निष्क्रिय व्यक्तीला पक्षात प्रवेश नसतो.[ads id="ads2"]
तालुकास्तरीय तसेच शहराध्यक्ष,विद्यमान शाखा अध्यक्ष,विविध आघाडीचे पदाधिकारी याचे भारतीय जनता पक्षातील कामकाज समाधानकारक आणि लोकप्रिय असल्याने आणि नवीन शहराध्यक्ष निवडताना पुनश्च त्यांचीच निवड करायची किंवा नाही किव्वा दुसऱ्याला संधी द्यायची किंवा नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेला नाही अशी माहिती मिळाली.