आंबेडकरी चळवळीचे वरिष्ठ नेते, पँथर रतनकुमार पंडागळे यांच्यावर गांवगुंडाचा प्राणघातक हल्ला :जटवाडा रोड, हर्सूल शिवारातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतीक, वृत्तसंस्था ) आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते महानगरपालिकेचे सलग तीनवेळा सभापती राहिलेले , रतनकुमार नारायण पंडागळे  वय ७०, रा. जयभीमनगर यांच्यावर तब्बल १० गावगुंडाने  प्राणघातक हल्ला चढवला. त्यांच्या कारची देखील तोडफोड केली.[ads id="ads1"]

   या हल्ल्यातुन तें थोडक्यात बचावले आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की, ९ जानेवारी रोजी हर्सूल,जटवाडा रोड, तलावाजवळच्या शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी, प्रकाश हरणे, किशोर हरणे, रुस्तुम हरणे, बाबूलाल हरणे, लालचंद ब्रह्मकर व ताराचंद वाणी यांच्यावर हर्सूल ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. या पैकी २आरोपीना अटक केली असून अन्य फरार आहे.[ads id="ads2"]

रतनकुमार पंडागळे यांची हर्सूल तलावालगत वीटभट्टी आहे.त्या जमिनीवरून वाद सुरू आहे. जमीन स्वतःच्या नावाने असून, सातबारा सुध्दा आहे. ९ जानेवारी रोजी ते गट क्रमांक २४०/१ हर्सूल शिवारातील जमिनीवर जेसीबीने साफसफाई करत होते. प्रकाश साथीदारांसह तेथे गेला व पंडागळे यांचा मुलगा व जेसीबी चालकाला धमकावले. आरोपींनी मोठा दगड उचलून पंडागळे यांच्या वर भिरकावला . लाठीकाठीने दोघांना व जेसीबी चालकाला मारहाण केली. जाताना पंडागळे यांची कार व जेसीबीची तोडफोड केली. पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनात फौजदार कृष्णा घायाळ पुढील तपास करत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!