फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
फैजपूर (प्रतिनिधी) भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे आज विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभागातील प्रा श्रीपाद वाणी हे होते. [ads id="ads1"]
याप्रसंगी हिंदी विभागाचे प्रमुख डॉ मनोज पाटील यांनी हिंदी भाषेला विश्वभाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी हिंदी साहित्यप्रेमींनी आणि समाजातील सर्वानीच प्रयत्न करण्याचे प्रतिपादन केले तसेच विश्वभाषा हिंदी व रोजगार याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रा राजेंद्र तायडे यांनी केले तर आभार डॉ प्रियंका महाजन यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास प्रा कविता पांडव उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.