ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला विज्ञान महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभाई पटेल कला विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार  (७दिवसीय) शिबिराचे दिनांक 24 जानेवारी पासून उत्साहात सुरुवात झाली.[ads id="ads1"]

   उद्घाटन प्रसंगी शिबिराचे उद्घाटक स्वातंत्र्य सैनिक कै.बा. बं. अंजने यांचे सुपुत्र प्राचार्य डाॅ. जे. बी. अंजने, बलवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ. वैशालीताई जितेंद्र महाजन,  बलवाडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री संतोष महाजन, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भागवत विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष श्री. रामदास नारायण महाजन, चेअरमन श्री. श्रीराम नारायण पाटील  सन्माननीय संचालक सदस्य, बलवाडी गावचे उपसरपंच श्री. संजय राजाराम वाघ, जि. प. शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य इ. मान्यवर उपस्थित होते.[ads id="ads2"]

   विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमापूजन,  माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. भागवत विश्वनाथ पाटील यांनी भूषविले उद्घाटक प्राचार्य जे. बी. अंजने यांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांना व्यक्तिमत्व विकास व श्रमसंस्कार हे    श्रमदानाच्या माध्यमातून शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये रुजत असते श्रमसंस्कार व वक्त्यांच्या  व्याख्यानातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भागवत विश्वनाथ पाटील यांनी अध्यक्षीय संबोधनातून विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार बरोबरच नेतृत्व गुण व वक्तृत्व गुण याचा विकास करावा असे मत व्यक्त केले राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी डाॅ. डि. बी पाटील यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका व विद्यार्थी प्रतिनिधी कु. दिपाशा गुरव हिने केले व व आभार प्रदर्शन स्वयंसेविका कु. निकिता कोळी हिने केले शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी. अंजने, प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉक्टर डी बी पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस बी पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!