यावल तालुका प्रतिनिधी ( फिरोज तडवी) : तालुक्यात ठीक ठिकाणी शासकीय निमशासकीय विभागानमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन करण्यात आले.
यावल तालुक्यात मोठ्या उत्सवाने 26 जानेवारी प्रजासात्तक दिन साजरा करण्यात आला असुन भारतीय संविधान वाचन, तंबाकू मुक्त भारत शपथ घेण्यात येऊन महापुरुषांना मानवंदना देण्यात आली.तेव्हा यावल तालुक्याचे प्रथम नागरिक तहसीलदार मोहनमाला माझीरकर यांच्या हस्ते तहसील आवारात ध्वजारोहन करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी नायब तहसीलदार विनंते,निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी,सुयोग पाटील, पुरवठा अधिकारी अर्चना भगत, मंडळ अधिकरी सचिन जगताप, तलाठी विजय वानखेडे, मिलिंद कुरकुरे,यांच्या सह तहसील कार्यालतील व तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, शिक्षक,तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते तर तालुक्यातील साकळी येथिल जिल्हा परिषद उर्दु शाळेत मोसिन खान यांच्या हस्ते ध्वजारोहनसाकळी येथिल जिल्हा परिषद उर्दु शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोहसीन खान असिफ खान यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.[ads id="ads2"]
ध्वजारोहन प्रसंगी मोहम्मद मोहसीन खान आसिफ खान यांनी विद्यार्थ्यांना राज्य व्यापी हॉकी स्पर्धान मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे आवाहन केले असुन ध्वजारोहन उत्सवात पार पाडले यावेळी जिल्हा परिषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शाळेत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य,विद्यार्थी पालक,विद्यार्थी,विद्यार्थिनी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांचं प्रमाणे यावल येथिल पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले या वेळी सर्व पंचायत समिती मधील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते,संपूर्ण यावल तालुका भारत माता की जय वंदे मातरम या जय घोषाने वातावरण देशमय झाले होते तर प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती कवाडीवले, सर्व कर्मचारी आशा गट परिवर्तक साकळी येथिल सर्व आशा ताई अर्धवेळ परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते,तसेच माध्यमिक विद्यालय शिरसाड साकळी येथे प्रजासत्ताक दिन शिवाजी मित्र मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय शिरसाड साकळी येथे भारतीय प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते भारत माता की जय वंदे मातरम या घोषणाच्या निनादात प्रभात फेरी गावातून शाळेच्या प्रांगणात पोहोचली. त्यानंतर विद्यालयाचे लिपिक श्री. चंद्रकांत भगवान पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन ,माल्या अर्पण व ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत झेंडा गीत राज्य गीत व देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष रवींद्र सूर्यभान पाटील व संस्थेचे सर्व पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संध्या अनंत शिंदे यांनी केले.संविधान वाचन सुद्धा करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना व सर्व मान्यवरांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रतिज्ञा देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुकुम चंद वसंत पाटील . तसेच . सुनील रघुनाथ पाटील, सौ.शुभदा दामोदर नेवे यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक शामकुमार पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.