यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये 'फन फेअर' कार्यक्रम संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील)

आज मंगळवार दि.३० जानेवारी २०२४ रोजी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये 'फन फेअर' कार्यक्रम पार पडला.   

       कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून यावल येथील तलाठी ईश्वरलाल कोळी सर,यावल महसूल कर्मचारी सुरज जाधव तसेच सौ.आरती धनगर मॅडम. तसेच वल्लभ भाई पटेल स्कूलचे चेअरमन राजेंद्र महाजन,शाळा सदस्य शशिकांत फेगडे,मिलिंद भालेराव सर इत्यादी प्रमुख अतिथींना आमंत्रित करण्यात आले होते.[ads id="ads1"] 

  सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले त्यानंतर शशिकांत फेगडे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ व  गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन उत्कृष्ट असे खाद्यपदार्थ बनवून आणले होते व अत्यंत छान प्रकारे टेबल सजविले होते.सर्वच प्रमुख अतिथींनी सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत सर्व विद्यार्थ्यांच्या कलाकुशलतेचे कौतुक केले. [ads id="ads2"] 

  या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य तसेच व्यवहार चातुर्य दिसून आले.विद्यार्थी खाद्यपदार्थ विकताना अत्यंत उत्साहित होऊन आपले कौशल्य सादर करत होते.या कार्यक्रमास सर्व पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती व सर्व पालकांनी आपल्या पाल्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आजचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात पार पाडण्यास सहकार्य केले. राजेंद्र महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत फेगडे सर व सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवर्ग यांच्या  सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.टिना निंबाळे मॅडम व सौ.जागृती चौधरी मॅडम यांनी केले.याप्रकारे आजचा फन फेअरचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!