रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त ग्रंथालयातर्फे आयोजित दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन यशस्वीरित्या झाले. उद्घाटन संस्थेचे माननीय चेअरमन श्री श्रीराम पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री रामदास महाजन सहसचिव श्री रामदास शिवराम महाजन, संचालक श्री. हरी भिका पाटील, संचालक श्री. कैलास कडू पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने सर. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.[ads id="ads1"]
उद्घाटन प्रसंगी ग्रंथालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. साळंके यांनी आपल्या प्रास्ताविकेत ग्रथं प्रदर्शनाचा उद्देश्य तसेच वाचन संस्कृती याबद्दल माहिती दिली. याबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यापीठामार्फत राबवीत असलेल्या ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी अभ्यासिका’ या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. यानंतर मराठी विभागाचे डॉ. एम के सोनवणे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याबद्दल माहिती देऊन ग्रंथ व वाचनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी संचालक मंडळ यांनी मराठी भाषेवरील ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध पुस्तकांचे परीक्षण करून उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनाबद्दल प्रेरित केले. [ads id="ads2"]
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने सर यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या विविध विषयांवरील संदर्भ साहित्य तसेच इतर वाचनीय साहित्याबद्दल माहिती देऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वाचनाला महत्त्व देऊन आपल्या सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन केले.
ग्रंथ प्रदर्शनास एकूण १०५ वाचकांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने सर यांच्या मार्गदर्शनात ग्रथंपाल डॉ. एस एस साळंके, आय. क्यू. ए. सी. समन्वयक तसेच उपप्राचार्य डॉ एस. एन. वैष्णव, डॉ. आर. व्ही. भोळे, डॉ. पी. आर. महाजन, डॉ. एस. एन. झोपे, डॉ. एस. ए. पाटील, प्रा. हेमंत बाविस्कर, डॉ. जयंत नेहेते, प्रा. एस. आर. इंगळे, डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. एस. पी. उमरीवाड, प्रा. पी. एन. तायडे, प्रा. अक्षय महाजन, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, श्री महेंद्र महाजन श्री हर्षल पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



.jpg)