फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
यावल येथील जिनिंग प्रेस खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सालाबादप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी ठीक 10 वाजता गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्यउपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तालुका गावकामगार पोलीस पाटील संघाची बैठक संपुर्ण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली,, यावेळी तालुका कार्यकारणीची घोषणा पोलीस पाटील संघाचे राज्यउपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर महाजन यांनी केली, [ads id="ads1"]
पोलीस पाटील यावल तालुका संघटना तालुकाध्यक्षपदी श्री. चंद्रकांत पाटील विरावली, उपाध्यक्षपदी श्री. विशाल जवरे पिळोदा बु। सचिवपदी श्री. राजरत्न आढाळे डोंगरकठोरा, तालुका संघटकपदी हरीश चौधरी पिंपरुळ, तालुका कार्याध्यक्ष श्री. पंकज बडगुजर सावखेडासीम,महिला तालुका उपाध्यक्षपदी सौ.रेखाताई सोनवणे किनगाव,प्रसिद्धीप्रमुखपदी श्री. चंदन पाटील सातोद,जेष्ठ मार्गदर्शकपदी श्री. मनोज देशमुख नायगाव व श्री. प्रवीण पाटील कासारखेडा, सदस्यपदी श्री.दिनेश बाविस्कर हिंगोणा,कु.मुक्ताताई गोसावी राजोरा, सौ.सरिताताई तडवी मालोद,श्री. किरण पाटील बोरावल, श्री. प्रमोद तावडे निमगाव, श्री. महेमुद तडवी परसाडे, श्री. राकेश साठे चिंचोली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, [ads id="ads2"]
तसेच या बैठकीत जिल्हापदाधिकारी म्हणून सौ.माधुरीताई राजपूत बोराळे व श्री. पंकज वारके यांची निवड राज्यउपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली, यावेळी बैठकीला जिल्हाकार्याध्यक्ष श्री. अशोक पाटील गिरडगाव,जिल्हाउपाध्यक्ष श्री. पवन चौधरी अट्रावल,जिल्हासंघटक श्री. सुरेश खैरनार पाडळसा व सौ.प्रफुल्लाताई चौधरी म्हैसवाडी,जेष्ठ पोलीस पाटील श्री. दिलीप पाटील सांगवी बु।,प्रसन्नकुमार पाटील हंबर्डी,सौ.नसीमाताई तडवी इचखेडा, उमेश पाटील डोणगाव,संतोष सुरवाडे करंजी,सौ.शारदा महाजन टाकरखेडा, दीपक पाटील कोळवद,विठ्ठल कोळी दगडी,अर्चना पाटील पिळोदा खु।,सुनील बारेला वाघझिरा,लक्ष्मण लोखंडे भालोद,विकास बोदडे वढोदा प्र सावदा, चेतन सोनवणे वढोदा प्र यावल उपस्थित होते, नवनिर्वाचित तालुका संघटनेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव तसेच सर्व नवीन कार्यकारिणी सदस्य यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत व नवीनच निवड झालेले पोलीस पाटील बंधू आणि भगिनींचा सत्कार समारंभ बैठकीत संपन्न झाला.याप्रसंगी सभेचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. पवन चौधरी यांनी केले तर सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे तालुका सचिव श्री.राजरत्न आढाळे यांनी केले,



