साक्री शहरात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास जी आठवलें यांचे जंगी स्वागत करीत त्यांच्या हस्ते पक्षाचे फलक अनावरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धुळे(अकील सादिक शाह) : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा पिंपळनेर व साक्री येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साक्री शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास आगमन झाले, साक्री येथे आगमन होताच वाद्य वाजवून फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले व तसेच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रिय महामार्ग क्रमांक 6 नागपूर सुरत वरील आदर्श नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे फलक अनावरण करण्यात आले.

   व तसेच साक्री शहरातील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बापू गीते, विठ्ठल भाऊ मारनर, हाजी शब्बीर शहा, रशीद शहा,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साक्री तालुकाध्यक्ष कमलाकर मोहिते, धुळे जिल्हा उपाध्यक्ष बंटी मोरे, उत्तर महाराष्ट्र सदस्य हेमंत वाघ अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले  साहेब यांचा सत्कार करण्यात आला शेवटी साक्री तालुक्यातील नागरिकांच्या वतीने विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले,[ads id="ads2"]

 धुळे जिल्ह्यातील मुस्लिम छप्परबंद (शहा) समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, व्हॅलिडीटी काढताना येणाऱ्या अडचणी व ते मिळावे या समस्या सोडवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले पुढे साक्री शहरातील विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधून पक्षासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी  हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही या साठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!