यावल ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल येथे अयोध्या श्री राम मंदिर उदघाट्न सोहळा उत्सव मोठ्या उत्सव पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी या कार्यक्रमाला प्रसंगी अध्यक्षस्थनी शाळेच्या प्रचार्या सौं. रंजना महाजन यांनी भूषविले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प.पू. सद्गुरू शास्त्री सरजुदासजी स्वामी {स्वामीनारायण मंदिर वडताल } व नारायण भगत यांनी उपस्थिती दिली.[ads id="ads1"]
तसेच इंग्रजी माध्यम चे प्राचार्य डॉ. किरण खेट्टे व आय. टी. आय चे प्राचार्य जी. जी. वाघूळदे यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दिली.प्रमुख पाहुण्याचे हस्ते श्री. गणेश पूजन व प्रभू रामचंद्राचे पूजन करून दीपप्रज्वलन केले व कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.[ads id="ads2"]
ह्या कार्यक्रमचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रद्धा बडगुजर यांनी केले. तसेच माहिती अर्चना पाटील यांनी सांगितले. व आभार परदर्शन सरोज येवले यांनी केले.
यानंतर विध्यार्थी यांनी प्रभू रामचंद्राच्या गाण्यावर नृत्य सादर केले व मोठ्या विद्यार्थ्यांनि प्रभुरामचंद्र याच्या चारित्र्यवर नाटिका सादर केली.
कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले. व या कार्यक्रम अतिउत्सहात साजरा झाला.



