नशिराबाद टोल नाक्याला भगव्या झेंड्याची ऍलर्जी..?
यावल ( सुरेश पाटील ) : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार असल्याने संपूर्ण देशासह, राज्यात जळगाव जिल्ह्यात ९० % ठिकाणी भगव्या झेंड्यांनी पताक्यानी सजावट करण्यात आली आणि ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सजावटीचे काम सुरू आहे.परंतु जळगाव जिल्ह्यात नशिराबाद टोल नाक्याजवळ एकही आणि परिसरात एकही भगवा झेंडा किंवा पताका लावलेली आढळून न आल्याने,टोल नाका कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( न्हाई ) विभागाला तथा अधिकाऱ्यांना भगव्या येण्याची पथकांची एलर्जी आहे का..? याचा खुलासा जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांनी खासदारांनी आमदारांनी करायला पाहिजे असे सर्व स्तरात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
आयोध्या येथे सोमवार दि.२२ जानेवारीला श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे याच उत्साहपूर्ण पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आणि देशात विविध मंदिरांमध्ये सार्वजनिक, व्यावसायिक,खाजगी, औद्योगिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे,अनेक ठिकाणी रोषणाई, भगवे झेंडे,पताका आणि श्रीरामाची आकर्षक मूर्ती असलेले बॅनर छायाचित्र लावले गेले आहेत.[ads id="ads2"]
परंतु आज दि.२० जानेवारी २०२५ रोजी दुपारी १६:३० ते १६:५० वाजेच्या सुमारास जळगाव कडून यावल कडे येत असताना नशिराबाद टोल नाक्याजवळ भगव्या झेंड्याची एकही पताका बॅनर झेंडा लावलेला दिसून आला नाही त्यामुळे टोल नाका कॉन्ट्रॅक्टरला भगव्या झेंड्याची एलर्जी आहे का..? आणि आयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होणार असल्याने टोल नाक्यावर भगव्या पताका, झेंडे कॉन्ट्रॅक्टरने का लावले नाहीत..? जळगाव जिल्ह्यातील मंत्री,खासदार, आमदार,जिल्हाधिकारी जळगाव,आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रादेशिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सूचना दिलेल्या नाहीत का..? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.लोकप्रतिनिधींनी याबाबत जनतेच्या माहितीसाठी २४ तासाच्या आत खुलासा करावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.


