यावल (सुरेश पाटील) : अयोध्या येथे सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर यावल शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात विविध मंदिरांमध्ये आणि ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत तसेच भगव्या पताका, झेंडे मोठ्या उत्साहाने लावली जात आहेत तालुक्यातील विरावली येथे संपूर्ण गाव भगवे मय झाले आणि संपूर्ण परिसरात श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहे.[ads id="ads1"]
विरावली येथे राममंदिर प्रतिष्ठापनेच्या सोहळ्या निम्मित विरावली येथे मंदिर व गावात सजावट करण्यात आली त्या प्रसंगी मा.शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.सभापती कृऊबास यावल मुन्नाभाऊ पाटील,मा.उपसरपंच ईश्वर भाऊ पाटील,पोलिस पाटील चंद्रकांत पाटील,राजेंद्र भास्कर पाटील,समाधान पाटील , संजय पाटील,संदीप पाटील, भागवत पाटील,कैलास पाटील,विरावलिकर महिला मंडळ,विरावलीकर भजनी मंडळ,व समस्त विरावलीकर ग्रामस्थ उपस्थित होते.


