यावल ( सुरेश पाटील ) यावल तालुक्यातील साकळी येथील हुतात्मा झालेले कै.बापू वाणी यांच्या सामाजिक जीवनातील आठवणींना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त नुकत्याच एका छोटेखानी कार्यक्रमात उजाळा देण्यात आला सदरचा स्मृती दिनाचा कार्यक्रम भाजपाचे जेष्ठ आघाडी अध्यक्ष वसंत दगडू भोसले यांनी यावल येथील श्री दत्त मंदिरात आयोजित केला होता.[ads id="ads1"]
कै.बापू वाणी यांचा पुण्यतिथी तथा स्मरण दिन कार्यक्रम बाळकृष्ण गणू वाणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.प्रास्ताविकात अंबादास राजाराम वाणी यांनी तसेच भाजपाचे जेष्ठ आघाडी अध्यक्ष वसंतराव भोसले यांनी कै.बापू वाणी यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि हुतात्मा कशाप्रकारे झाले त्याबाबतची माहिती दिली.गोपालसिंग पाटील अंबादास राजाराम वाणी ( दादा वाणी ), बापू वाणी यांची नात यांनी हुतात्मा बापू वाणी यांच्यावर आधारित गीत गायन केले.[ads id="ads2"]
पुण्यतिथी तथा स्मरण दिन कार्यक्रमात वसंतराव भोसले,अंबादास राजाराम वाणी,गोपालसिंग राजपूत,डॉ. निलेश गडे,बबलू घारू, मुरलीधर शंकर चौधरी,भास्कर बुधो तायडे,भैय्या भोईटे,अरुण भोईटे,पंकज प्रकाश नेवे, संजय भाऊराव वाणी,अरुण हरिभाऊ कुलकर्णी,प्रभाकर नेमिनाथ वाणी,किरण बाळकृष्ण नेवे,चंद्रकांत बाळकृष्ण नेवे,गणेश जगन्नाथ देशमुख, सौ.निलिमा अजय नेवे,शामकांत गजानन कवडीवाले,सौ.आशा अंबादास वाणी,नलिनी नंदकिशोर वाणी, अजय प्रभाकर सोनार, इत्यादी सामाजिक,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.