खेडी-कोरपावली येथे हजरत पिर गैबंशाह वली बाबा उर्स निमित्ताने कव्वालीचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
 यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील कोरपावली   वेथील राष्ट्रीय एकात्मते प्रतिक व पंचक्रोशीतील प्रसिद्ध व असंख्य हिंदु मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत  पीर गैबं शाह वली  बाबा उर्स साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.[ads id="ads1"]

कोरपावली गावातील गजबजलेल्या मुख्य चौकात   प्रसिद्ध असलेल्या हजरत हजरत पीर गैबंशाह बाबा यांच्या दर्गावरील उर्स ( यात्रा ) मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.  सोमवार दि. १६  जानेवारी रोजी संदल कार्यक्रम होणार असून , मंगळवार दि. १७ जानेवारी  रोजी दिल्लीचे    ' अजमेर चलो ए दिवाने  '  प्रसिद्ध कव्वाल अक्रम अस्लम साबरी व औरंगाबाद  च्या प्रसिद्ध फनकारा परवीन तब्स्सून यांच्या जुगलबंदीचा भव्य असा कव्वालीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. [ads id="ads12"]
  कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  तरी पंचक्रोशितील सर्व धर्मिय भाविकांनी दर्गावरील दर्शन संदल व कव्वातीच्या कार्यक्रमात उपस्थित  राहून कववळीचा आनंद लुटावा  असे आव्हान  कोरपावली येथिल हिन्दु मुस्लीम  पंच  कमेटी ,यांच्या वतीने करण्यात आले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!