रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
रावेर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील काही दिवसांपासून तुंबलेल्या गटारींकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने सर्विकडे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे वाढत्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या प्रकारामुळे ग्रामस्थांतुण तीव्र संताप व्यक्त होत आहे.गावातील गटारींची मागील काही दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही.[ads id="ads1"]
त्यामुळे गटारी तुडूंब भरून आहे. त्यात वळिवाच्या पावसाने गटारींतील घाण गल्लीत पसरली आहे. तसेच गटारींत कचरा साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे देखील ग्रामस्थांना मुष्कील बनले आहे. दरम्यान डासांचा उपद्रवही वाढला आहे. त्यामुळे लहान बालकांना गल्लीत खेळणे देखील अवघड झाले आहे.त्यामुळे ग्रामस्थांना गल्लीतून जाताना नाक मुठीत धरूनच जावे लागत आहे.[ads id="ads2"]
अनेकवेळा याबाबत नगरपालिका अध्यक्ष व सदस्यांना देखील माहिती देण्यात आली आहे. त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गावात गल्लोगल्ली गटारी तुंबल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.