काही ग्रामसेवकांनी चुकीचा अहवाल दिलेला असून तर काही ग्रामसेवक मोजनीसाठी फी भरलेली आहे असे सांगून वेळ मारून नेत आहे व आपल्या कर्तव्यात कसूर करून शासनाची दिशाभूल करीत आहे तरी आपले स्तरावरून सदरील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण कायम करण्यात यावे व त्वरित त्यांचे घरकुल सहित प्रस्ताव मागणीसाठी आदेश द्यावे व आज पावतो कसूर करणाऱ्या ग्रामसेवक सरपंच यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी मागणी क्रमांक 2 रावेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ ,विधवा परीतक्या इत्यादी योजने करता प्रस्ताव सादर करण्यासाठी वयाच्या दाखल्याची व फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता असताना सदरील दाखले हे रावेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत दिले जातात परंतु सदरील दाखले हे फक्त आठवड्यातून एक दिवस दिले जातात तेही फक्त बारा वाजेपर्यंत असे असतात गरजूंना तालुक्यावर वेळेवर मोठे जिकरीचे झाले आहे त्यांना खेड्यापाड्यावरून बारा वाजेपर्यंत पोहोचणे शक्य होत नसल्याने त्यांना परत परत प्राथमिक केंद्रात फेऱ्या मारून नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.[ads id="ads2"]
तसेच महिला शस्त्रक्रिया बाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यवस्था नसल्याने शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांसाठी मोठा पेच निर्माण झालेला आहे त्यांना इतरत्र जाण्याचे सल्ले दिले जातात असे असता तालुक्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण होत आहे तरी त्यावर सुद्धा लवकरात लवकर निर्णय घ्यावा मागणी क्रमांक 3 वन विभागामार्फत करण्यात आलेल्या नाले बांध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला असून शासनाच्या निधीचा गैर वापर करण्यात आलेला आहे सदर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेल्या या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी मागणी क्रमांक 4 रावेर तालुक्यातील बहुतेक ठिकाणी अतिक्रमण धारकांना भोगवटा धारक म्हणून उतारे देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून घरपट्टी पाणीपट्टी वसूल केली जाते परंतु त्यांचे घरकुल बाबतचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर स्वीकारले जात नाहीत त्यामुळे त्यांना नाहक हाताशी उतारे असताना सुध्धा घरकुल पासून वंचित राहावे लागत आहे तरी म. गट विकास अधिकारी यांनी त्वरित ग्रामसेवकांना पत्र देऊन अशा भोगवटा धारकांचे प्रस्ताव मागवण्यात यावे मागणी क्रमांक पाच5गाते येथील वार्ड क्रमांक चार मध्ये संपूर्ण पणे गटारी रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत त्याकडे ग्रामपंचायत मार्फत हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले जात आहे व त्यांना नागरी सुविधा पासून वंचित ठेवले जात आहे त्यामुळे त्यांना पावसाळ्यामध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे व त्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तरी वार्ड क्रमांक चार मध्ये लवकरात लवकर नागरी सुविधा पुरविण्यात यावे व तेथील सरपंच ग्रामसेवक यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी मागणी क्रमांक 6 मौजे केराळे खुर्द येथील ग्रामसेवक ह्या मनमानी पद्धतीने कारभार करत असून सदस्यांना विश्वासात न घेणे ग्रामपंचायतला त्यांच्या मर्जीनुसार येणे गावकऱ्यांना आवश्यक असलेले दाखले देण्यास टाळाटाळ करणे मासिक मीटिंग बाबत अजेंडे न देणे ग्रामसभा न घेणे अशा पद्धतीने मनमानी व कर्तव्यात कसूर करीत आहे शासनाची दिशाभूल करीत आहे तरी अशा ग्रामसेविकेवर त्वरित चौकशी होऊन निलंबनाची कारवाई करावी इत्यादी मागण्यासाठी आज रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून आमच्या मागण्या येत्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू भाऊ सूर्यवंशी यांनी सांगितले.
यावेळी राजू भाऊ सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष,विकी तायडे रावेर तालुका अध्यक्ष,नरेन तायडे तालुका सचिव,भीमराव तायडे संघटक,समाधान गाढे स ह संघटक,किरण साबळे,अनिकेत घेटे संपर्क प्रमुख, राहुल लहासे व असंख्य महिला कार्यकर्त्या हजर होत्या,निवेदन रावेर नायब तहसीलदार संजय तायडे, व सहायक गट विकास अधिकारी फेगडे साहेब यांना देण्यात आले


