यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यातील किनगाव खुर्द परिसरात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या एका ठिकाणी चोपडा तालुक्यातून आणलेल्या एका मुलीसोबत अनैतिक कृत्य केल्याप्रकरणी यावल पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची ( १ जण चोपडा तालुक्यातील असल्याची शक्यता 95 टक्के आहे ) व दोन मुले फरार झाल्याची घटना काल शुक्रवार दि. ५ रोजी घडल्याची जोरदार चर्चा यावल व चोपडा तालुक्यात आहे.[ads id="ads1"]
चोपडा तालुक्यातील एका मुलीला आणणारा चोपडा तालुक्यातील मुलगा कोण आणि कुठला ..? किनगाव खुर्द येथे त्या मुलीला खाण्यापिण्यासाठी मदत करणारे मुले कोण..? त्या मुलीवर अन्याय अत्याचार कोणी केला आहे का..? किनगाव खुर्द येथील ही घटना म्हणजे परिसरात,संपूर्ण यावल व चोपडा तालुक्यात एक अफवा आहे की घटना घडली याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे किंवा नाही..? याबाबत यावल पोलीस तपास / चौकशी करीत असल्याची जोरदार चर्चा सुद्धा आहे.