रावेर - पाल रस्त्यासाठी कृती समिती रस्त्यावर उतरणार ; खा.रक्षा खडसे यांना दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



    रावेर प्रतिनिधी (चांगो भालेराव) सन २०१६ मध्ये रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी मध्यप्रदेश मधील धार, बिस्टान , मार्गे पाल, कुसुंबा,मुंजलावडी,रावेर हा रस्ता महामार्ग क्र.३४७ सी म्हणुन घोषित केलेला असुन भारत सरकार ने प्रकाशित केलेल्या राजपत्रात व नकाशामध्ये या हायवे रस्त्याचा ठळकपणे उल्लेख आहे. मात्र मागील आठ वर्षापासून कोणतीच कारवाई न झाल्यामुळे रावेर पाल रस्ता हा आजही प्रजिमा क्र.१ म्हणूनच शासन दरबारी ओळखला जात असल्याने या रस्त्याचे इस्टीमेट प्रत्येक वेळी हलक्या प्रतीच्या बांधकाम साहीत्याचे तयार होत आहे.[ads id="ads1"]

  आणि या रस्त्याने दरोरोज शेकडो मालवाहू व अवजड कंटेनर ची वाहतूक होत असल्याने हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना या रस्त्याचा व अवजड वाहनांचा नाहक त्रास करावा लागत आहे.  यामुळे पाल, निमड्या, सहस्रलिंग, मुंजलवाडी, कुसुंबा खुर्द, कुसुंबा बु, लोहारा, सिंदखेड येथील सर्व राजकीय पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते, सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रां. प. सदस्य यांनी एकत्र येत सर्वपक्षीय रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती तयार करुन हा रस्ता प्रजीमा मधुन हायवे मध्ये रूपातर करण्यासाठी लढा उभारला असुन सर्व आदिवासी भागातील पेसा ग्रा. प. व इतर ग्राम पंचायतीनी ग्रामसभा आयोजित करून सर्व ग्राम पंचायतीनी  सदर रस्ता प्राजिमा मधुन दर्जोंनत करून हायवे मध्ये रुपांतर करण्याचे सर्वानुमते ठराव पारित केलेले असल्याने. सदर कृती समितीने आज रावेर लोकसभा मदारसंघ खासदार रक्षा ताई खडसे, तसेच जिल्हाधिकारी जळगांव, यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन देऊन सदर रस्ता लवकरात लवकर हायवे मध्ये रुपांतरीत करावा व जो पर्यंत हा रस्ता हायवे मध्ये रुपांतरीत होत नाही तो पर्यंत रावेर व पाल या दोन्ही ठिकाणी नाकाबंदी करून या रावेर पाल रस्त्याने होणारी अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी अन्यथा रावेर पाल रस्ता हायवे कृती समितीचे वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करून या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे.[ads id="ads2"]

  सदर निवेदनाच्या प्रती माननीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, माननीय प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरण, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग धुळे, मा. तहसिलदार रावेर यांना देण्यात आलेले आहे यावेळी रावेर पाल रस्ता हायवे कृती समितीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती योगेश पाटील, कुसुंबा खुर्द सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच मुकेश पाटील, निमड्या सरपंच रतन पावरा, लोहारा सरपंच लियाकत तडवी, मुंजलवाडी सरपंच अशोक हिवराळे, प्रदीप सपकाळे, नारायण घोडके, अतुल महाजन, चांगो भालेराव, निवृत्ती महाजन, कामिल शेठ तडवी, अरमान तडवी, धरमसिंग पाटील, रवींद्र महाजन आणि कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!