आरोपी पोलिसांच्या ताब्यात
यावल ( सुरेश पाटील ) वडिलांनी लग्न करून न दिल्याने,तसेच लग्नाला पैसे लावा असे सांगितल्यावर सुद्धा वडिलांनी मुलाचे लग्न लावून न दिल्याने मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला / रात्री म्हणजे दि.१४ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजता मुलाने त्याच्या आई समोरच वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने २ ते ३ वार करून जागीच ठार ठार केल्याची घटना यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे घडली यामुळे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की,रविवार दि. १५ जानेवारी २०२४ रोजी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत सौ.सुभाबाई रतन कोळी वय 60 वर्ष व्यवसाय घरकाम रा. पिळोदा खुर्द ता.यावल.जि. जळगाव समक्ष पोलीस स्टेशन ठाण्यात हजर होवून फिर्याद लिहून दिली वरील ठिकाणी माझे पती रतन तानसिंग कोळी याचेसह राहते व घरकाम करते रतन कोळी याची पहिले पत्नी सुमारे 40 वर्षापुर्वी मयत झाली.[ads id="ads2"]
आहे.त्यांनतर माझे रतन कोळी यांच्याशी लग्न झालेले आहे. रतन कोळी याचे पहील्या पत्नी पासुन ३ मुली असुन त्यांची लग्न झालेले आहे ते त्याचे सासरी नांदत आहेत पती रतन कोळी यांच्या पासुन मला २ मुले प्रविण वय ३५ वर्ष व लहान मुलगा देवांनद वय २८ अशी मुले आहेत मुलगा प्रविण याचे लग्न झालेली असुन तो त्याची पत्नी सौ.भावना हिच्याशी झालेले असुन तो जळगाव येथे राहतो.लहान मुलगा देवानंद हा अविवाहीत असुन तो मजुरी करतो मुलगा देवानंद व आम्ही पती व पत्नी असे एकत्र एकाच घरात राहतो देवानंद हा नेहमी माझे लग्न लावुन द्या असे म्हणत होता.
काल रविवार दि.१४ जानेवारी रोजी रात्रीचे जेवण वैगरे करुन आम्ही तिघ जण घरात झोपलो घराचे पुढे ओसरीत पती रतन तानसिंग हे खाटेवर झोपले व मी घरात झोपले व दुस-या खोलीत मुलगा देवानंद झोपलातेव्हा रात्री ११ वाजेचे सुमारास मी घरात खाटेवर झोपण्यासाठी पडलेली असता मी जागेच असताना,झोपलेली नसताना मुलगा देवानंद हा माझे समोर त्याचे हातात कु-हाड घेवुन घराबाहेर ओसरीत गेला व त्यांनी माझे समोर माझे पती रतन तानसिंग कोळी यांचे डोक्यात २ ते ३ कु-हाडीचे वार केले त्यामुळे रतन तानसिंग याचे डोके "फुटले व मोठा प्रमाणात रक्त स्त्राव होवुन ते जागीच मयत झाले.मुलगा देवानंद यास थाबविण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत त्याने पती रतन तानसिंग यांचे डोके कु-हाडीने फोडले होते.त्यांनतर मुलगा देवांनद हा बाहेर पळुन गेला म्हणुन मी मोठ मोठ्याने आरडा ओरड केली त्यामुळे शेजारी राहणारे संदीप जयसिंग कोळी,रविद्र तानसिंग कोळी,व जयसिंग तानसिंग कोळी हे आले व त्यांनी पतीना पाहीले त्यांनी मुलगा देवानंद यांचा पाठलाग केला मुलगा देवानंद याने त्याचे लग्न होत नव्हते तो त्याचे वडीला कडे नेहमी माझे लग्न करुन द्या माझे लग्नला पैसा लावा असे म्हणत होता परंतु पति रतन तानसिंग कोळी हे टाळाटाळ करीत होते त्याचा देवानंद यास राग आल्याचे कारणावरुन त्याने त्याचे हातात लोखडी कु-हाड घेवून माझे समोर पति कोळी हे झोपलेले असतांना त्याचे डोक्यात कु-हाडीचे २ ते ३ घाव मारुन त्यांना जागीच ठार मारुन त्याचा खुन केला आहे.म्हणुन माझी मुलगा देवानंद रतन कोळी रा.पिळोदा खुर्द ता. यावल याचे विरुध्द फिर्याद आहे अशी फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनला 302 दाखल झाला आहे.पुढील तपास यावल पोलीस करीत असून आरोपी पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली.




