भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि.15 रोजी अकलूज फाटा तापी नदी पुलावर केंद्र शासनाने पारित केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने असंख्य वाहनचालकांना सोबत घेऊन आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन केले.यामुळे तासभर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.[ads id="ads1"]
सरकारने पारित केलेला हिट अँड रन हा कायदा पूर्णपणे एकतर्फी असून वाहन चालकावर अन्याय करणार आहे.या कायद्यामुळे देशभरातील वाहन चालकांवर अन्याय होणार असून त्यांचे पूर्ण कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन चालकांमध्ये कमालीची नाराजी असून हा काळा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा ही रास्त मागणी समस्त वाहन चालकांसह वंचित बहुजन आघाडीची देखील आहे.[ads id="ads2"]
सदर आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांनी केले. याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव योगेश तायडे,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान मुल्लाजी, युवा जिल्हा उपाध्यक्ष युनुस तडवी, जिल्हा संघटक बबन कांबळे,गणेश इंगळे,दीपक वाघ यांच्यासह जिल्हाभरातील वाहन चालक-मालक संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले तसेच पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.


