यावल नगरपालिकेची वार्षिक सर्वसाधारण निविदा काही ठेकेदारांसाठी "ऑफलाइन"

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऑनलाइन निविदा का नाही..?

ठेकेदारांमध्ये चर्चा

निविदा मॅनेज होणार..? ठेकेदारांमध्ये चर्चा

यावल  (सुरेश पाटील) : यावल नगर परिषदेकडून  वार्षिक सर्वसाधारण निविदा २०२४- २५ प्रथम वेळेस काढली आहे. ही निविदा प्रत्यक्ष बघितली असता निविदा ऑफलाइन पद्धतीने काढल्याने ऑफलाइन निविदा ही ठराविक ठेकेदारांना मिळण्यासाठी यावल नगरपालिकेने काढली असल्याचे तसेच ऑनलाइन निविदा का काढले नाही याबाबत ठेकेदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे तरी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी तात्काळ ऑनलाईन निविदा काढावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.[ads id="ads1"]

          प्रसिद्ध झालेली वार्षिक सर्वसाधारण निविदा सन २०२४-२५ प्रथम वेळ मुख्याधिकारी,यावल यांनी काढली त्यात नमूद आहे की,यावल नगरपरिषद यांच्याकडे सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरीता खालील विवरणात नमूद केलेल्या आरोग्य /अग्निशमन / पाणीपुरवठा व विविध विभागा करीता वार्षिक निविदा साठी सर्व साधारण निविदा योग्य पंजीबद्ध कंत्राटदार,विक्रेता,पुरवठादार, सेवा सहकारी संस्था,सेवाभावी संस्था यांचेकडून कार्यादेश दि.पासून ते ३१/०३/२०२५-पर्यंतची कालावधीसाठी मागविण्यात येत आहे. सर्वसाधारण निविदा पुढील प्रमाणे: १) पाणीपुरवठा विभागातील पाणीपुरवठा यंत्रणाच्या शहर पाणीपुरवठाकरणारी पाईपलाईन व व्हॉल्व लिकेज दुरुस्तीचे काम मजुरीसह दुरुस्ती करणे(काम तत्वावर)  ( २ ) पाणीपुरवठा यंत्रणासाठी जलशुद्धीकरण केंद्र करीता अॅलम (ग्रेड-४) व ब्लिचिंग पावडर (ग्रेड- १) पुरवठा करणे. ३) आरोग्य विभाग करीता सार्वजनिक शौचालये, प्रसाधन गृह,शहरातील गटारी, नाले,सांडपाणी यांवर फवारणी करणे तसेच धुरळणी / धुर फवारणीसाठी जंतूनाशके पुरविणे. ४) आरोग्य विभाग करीता विविध कामांसाठी प्रति दिवस दराने ट्रॅक्टर ट्रॉली पुरविणे व बॅक हु लोडर प्रती तास प्रमाणे पुरविणे. ५) पाणीपुरवठा विभागात योजनेची देखभाल दुरुस्तीसाठी सबमर्सिबल पंप, मोटर दुरुस्ती व इलेक्ट्रिक साहित्य पुरवठा करणे. ६) यावल नगरपरिषदेचेअग्निशमन वाहन मजुरी व साहित्यासह दुरुस्ती करणे. ७) न.प.करीता विविध आवश्यक स्टेशनरी साहित्य पुरविणे ८)आरोग्यव विविध विभागासाठी आवश्यक छपाई व प्रिंटींग करणे ९) यावल शहरात आवश्यकतेनुसार बॅरकेट व मंडप व्यवस्था पुरविणे १०) आरोग्य विभागासाठी स्वच्छता विभाग कर्मचारी यांना गणवेश व ईतर आवश्यक साहित्य पुरविणे.[ads id="ads2"]

११) यावल न.प.हद्दीतील गट क्र. ७०४/७०५ फालक नगर स्वामी समर्थ मंदिर येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे, १२) यावल न.प.हद्दीतील गट क्र.६८८ (ब) एस टी कॉलनी भास्करनगर येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे. 

( १३)यावल न.प.हद्दीतील गट क्रमांक ४६ (ब) गणेश नगर येथील बगीचा देखभालदुरुस्ती करणे.१४) यावल न.प. हद्दीतील गट क्रमांक ७०८ आसारामनगर येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे. १५) यावल न.प. हद्दीतील गट क्रमांक ३३ व्यास मंदिर येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे. १६) यावल न.प. हद्दीतील विरारनगर गट क्रमांक २६ गजानन मंदिरा शेजारी येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे.

१७) यावल न.प.हद्दीतील गट क्रमांक ३३ महादेव मंदिर येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे. 

१८) यावल न.प. हद्दीतील गट क्रमांक ७५४-१ व ७५४-२ गंगानगर येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे.

अ.क्र.१ ते १८ ऑफलाईन सर्वसाधारण निविदा असून दिनांक १०/०१/२०२४ ते दिनांक २२/०१/२०२४ पर्यंत नगरपरिषद कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत सादर करणे.अधिक माहितीसाठी नगरपरिषद कार्यालय यावल येथे उपलब्ध राहील. असे दिलेल्या जाहिरातीत यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी नमूद केले असले तरी आज एका ठेकेदारांमार्फत निविदा फॉर्म नगरपरिषद घेण्यासाठी गेले असता आज दिनांक 15 रोजी यावल नगर परिषदेत निविद्याचे फॉर्म नसल्याचे सांगितले यामुळे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी सदरची निविदा ही ऑनलाइन पद्धतीने काढावी अशी मागणी ठेकेदारी वर्गातून करण्यात आली आहे.

       कारण मागील वर्षी दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी यावल नगरपरिषदेने वार्षिक ' ई ' निविदा प्रथम वेळ ऑनलाइन काढलेली होती आणि आहे वार्षिक निविदा काढताना निविदा काढण्याची प्रक्रिया ही निश्चित अशी असते अर्जंट नसते अर्जंट असल्यास ऑफलाईन निविदा काढता येते परंतु निश्चित निविदा असल्याने ऑनलाईन निविदास काढायला पाहिजे असा नगरपालिका नियम आहे त्यामुळे यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांनी वार्षिक निविदाही ऑनलाईन पद्धतीने काढायला पाहिजे असे ठेकेदारी वर्गात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!